बुलढाणा
रविकांत तुपकारांच्या अन्न त्याग आंदोलनाचा चौथा दिवस…
प्रकृती खालावली, राज्यातील शेतकरी आक्रमक…
फक्त आश्वासन नको, सुनावले कृषी मंत्र्यांना..
सोयाबीन कापसाला योग्य भाव मिळावा , पिक विमा 100 टक्के मिळावा, झालेल्या नुकसानीचा मोबदला पूर्ण मिळावा यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी जिजाऊ राजवाडा सिंदखेडराजा येथे गेल्या चार दिवसापासून अन्न त्याग आंदोलन सुरु केले आहे… अद्याप सरकार ने दखल न घेतल्याने शेतकरी आक्रमक झाले असून ठिकठिकाणी आंदोलन करीत आहे…
कृषी मंत्री धनंजय मुंढे यांनी रविकांत तुपकर यांच्याशी फोन वरून चर्चा केली आंदोलन मागे घेण्याची विनंती केली व आश्वासन दिले मात्र तुपकरांनी ते आश्वासन नको कृती मध्ये आवश्यक आहे त्यामुळे तुपकर अन्न त्याग आंदोलनावर ठाम आहे… आता आज व उद्या शेतकरी ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करणार असल्याचे जाहीर करीत होणाऱ्या त्रासाला सरकार जबाबदार असल्याची प्रतिक्रिया रविकांत तुपकरांनी दिली…
शेतकरी हातात कायदा घेण्याच्या तयारीत असल्याचे तुपकारणी म्हटले आहे त्यालाही सर्वस्वी जबाबदार सरकार असेल असा गंभीर ईशारा रविकांत तुपकारणी दिला आहे…