बुलढाणा
सिद्धार्थ खरात यांना मेहेकर मतदार संघात वाढता पाठींबा…
शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन केली पाहणी….
शासकीय सेवेतून स्वतः निवृत्ती घेत सामाजिक दृष्टी समोर ठेऊन राजकारणात येण्याचा निर्णय घेत थेट उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेईन बुलढाणा जिल्ह्यातील राखीव मतदार संघात विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचा ठाम निर्णय सिद्धार्थ खरात यांनी घेतलाय… सिद्धार्थ खरात यांनी मेहेकर विधानसभा मतदार संघात मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली असून गावा गावात भेटींगाठी घेण्यास जोमाने सुरुवात केली आहे.. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी मध्ये मेहेकर तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांच्या शेतीपिकाचे मोठे नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली व शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचे काम खरात यांनी केले तर प्रशासणाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काल आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे…
सिद्धार्थ खरात मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील असल्याने मेहेकर मतदार संघात त्यांना उस्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.. त्यामुळे होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना मोठे मताधिक्य मिळण्याचे चित्र असल्याचे दिसून येत आहे.. . महायुतीचे दोन दिग्गज या मतदार संघात गेल्या 30 वर्षापासून राज्य करीत आहेत.. आजही मतदार संघात विकासाचा बोलबाला दिसून येतोय.. कुठेही ठोस विकास मतदार संघात झाला नसल्याने मतदारसंघातील लोक नाराजी व्यक्त करीत आहे.. आता मेहेकर मध्ये सिद्धार्थ खरात बाजी मारणार का यावर ठिकठिकाणी चर्चा होताना दिसत आहे…