डॉ. बाबासाहेब आंबेडकर मानवजातीला दिशादर्शक ध्रुवतारा
डॉ. गोपाल बछीरे
छ. संभाजीनगर 7 डॉ. बाबासाहेब आंबेडकर मानवजातीला दिशादर्शक ध्रुवतारा असे वक्तव्य डॉ. गोपाल बछीरे महापरिनिर्वाण दिनानिमित्त व्याख्यानात केले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग च्या उपायुक्त मा. जयश्री सोनकवडे जाधव यांनी सामाजिक न्याय भवन छ. संभाजीनगर येथे आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रमात डॉ. गोपाल बछीरे प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते बाबासाहेबांच्या जीवनपटावर प्रकाश टाकून ते पुढे म्हणाले बाबासाहेबांचे कार्य फक्त दलित पत दलित यांच्या उद्धारासाठी केले असे म्हणणे, म्हणजे सूर्याला लाजावण्यासारखे आहे बाबासाहेबांचे कार्य संपूर्ण मानव जातीचा उद्धार करणारे आहे, त्यामुळे ते भारताचे उद्धारक झाले आणि त्यांची बुद्धिमत्ता व कार्याचा सन्मान म्हणून आमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाने ‘सिम्बॉल ऑफ नॉलेज’ हा जगातील सर्वोच्च किताब डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला.
हा कार्यक्रम जात पडताळणी समितीचे अध्यक्ष श्री हरपाळकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व श्री कुलकर्णी साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला या कार्यक्रमास शासकीय वस्तीगृहाच्या शेकडो विद्यार्थीनी, प्रशासकीय अधिकारी, व मोठ्या संख्येने आंबेडकर प्रेमी उपस्थित होते.