8.3 C
New York
Friday, March 14, 2025

Buy now

spot_img

बुलढाणा पोलीस अकार्यक्षम …हप्ते वसुलीत पोलीस मग्न…कायदा सुव्यवस्थेचा उडाला बोजवारा …संजू भाऊंनी विधिमंडळात औचित्याचा मुद्दा उपस्थित करून वेधले सरकारचे लक्ष

बुलढाणा ब्रेकिंग न्यूज

बुलढाणा पोलीस अकार्यक्षम …हप्ते वसुलीत पोलीस मग्न…कायदा सुव्यवस्थेचा उडाला बोजवारा …संजू भाऊंनी विधिमंडळात औचित्याचा मुद्दा उपस्थित करून वेधले सरकारचे लक्ष

बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यकितीत कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून भाजीपाल्याचे दुकान लागावे तशी पोलीस अधीक्षक कार्यालय ,पोलीस स्टेशनच्या जवळपास वरली मटक्याचे दुकाने सुरू आहे पोलीस अधिकारी हफ्ते वसुलीत मग्न असल्याचा आरोप करत बुलढाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय गायकवाड यांनी नागपूर अधिवेशनात आज औचित्याचा मुद्दा उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले

हिवाळी अधिवेशना दरम्यान आज18 डिसेंबरला नागपूर येथे महत्त्वपूर्ण लक्षवेधी उपस्थित करताना आमदार संजुभाऊ गायकवाड यांनी बुलढाणा मतदारसंघातील तसेच शहरातील विविध महत्त्वपूर्ण विषयावर सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केले…!
यावेळी प्रामुख्याने सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित करताना खालील मुद्द्यांना प्राधान्याने हात घातला…!

कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात प्रश्न उपस्थित करताना आमदार संजुभाऊ गायकवाड यांनी सांगितले सध्या कार्यरत असलेल्या पोलीस अधीक्षकांच्या कारकिर्दीमध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये मागील ०६ महिन्यांमध्ये तीन जातीय दंगली झाल्या,आतापर्यंत लाखोंच्या संख्येने मोटरसायकल चोरी गेल्या, परंतु त्यांचा देखील पत्ता लागत नाही,त्यांची दखल ही पोलीस स्टेशनला घेतले जात नाही, घरफोड्या,चोऱ्या, वाटमाऱ्यांची संख्या ही हजारांच्यावर गेलेली आहे, अवैध दारू तसेच गावठी दारूचे प्रमाण अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे, तसेच मतदारसंघामध्ये भाजीपाल्याप्रमाणे वरली तसेच चकऱ्यांची दुकाने सुरू आहेत..!
ज्या गोमातेला आपण राजमातेचा दर्जा दिला तिची सर्रास हत्या सुरू आहे तसेच तिची तस्करी सुरू आहे…!
मध्यप्रदेश मधून येणारा अवैध गुटखा तसेच दारू ही सर्रासपणे शहरातील तसेच मतदारसंघातील पानटपऱ्यामध्ये लाखो रुपयांचे हप्ते देऊन विकल्या जातो…!
हजारोच्या संख्येने मतदारसंघातील अल्पवयीन मुली या बेपत्ता झाल्या परंतु पोलीस प्रशासनाला त्या शोधण्यात देखील अपयश आलेले आहे..!
तीन वर्षांपूर्वी आमदार संजय गायकवाड यांच्या घरासमोरील गाडीला समाजकंटकांनी पेटवून दिले होते त्याचा शोध देखील आतापर्यंत पोलिस प्रशासनाला लावता आला नाही..!
वाहतूक पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे अनेक बळी आपण जाताना बघत आहे हेल्मेट सक्ती असूनही हेल्मेट सक्ती करताना कोणीही दिसत नाही आणि त्यामुळे अनेक बळी हे दररोजचे जात आहेत..!
जुगार आणि अवैध धंदे हे सर्रासपणे पोलीस अधीक्षकांच्या समोर सुरू असताना देखील त्यावर कोणतीही कारवाई होत नाही कारण सर्वांचे लक्ष हे फक्त वसुलीवर आहे, परराज्यातून येणारे बटन नावाचे कॅप्सूल, गांजा, ड्रग्स,बॉण्ड हा नशा करून अल्पवयीन मुलं इतके बेधुंद होतात की त्यांच्याकडून एखादा गंभीर गुन्हा जरी झाला तरी त्यांना कळत नाही, त्यामुळे यावर देखील कोणताही बंधन घातले गेलेले नाही…!
औचित्याच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित करून या गैरप्रकाराला आळा घालण्याकरता शासन लवकरात लवकर कारवाई करणार आहे का असा महत्त्वपूर्ण मुद्दा यावेळी आमदार संजुभाऊ गायकवाड यांनी सभागृहामध्ये उपस्थित केला… बुलढाणा पोलिसांच्या अकार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करून कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा जिल्ह्यात उडाला ची बाब विधिमंडळाच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न आमदार संजय गायकवाड यांनी विधिमंडळात मुद्दा उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले आहे …

Related Articles

ताज्या बातम्या