मेहकर येथील शिक्षक किशोर गायकवाड यांची बुलढाणा जिल्हा अतिरिक्त समादेशक पदी नियुक्ती
मेहकर येथील किशोर बापूराव गायकवाड यांची महाराष्ट्र राज्य पोलीस व शिक्षण विभागाअंतर्गत कार्यरत रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण ऑर्गनायझेशन कोल्हापूर यांच्याकडून बुलढाणा जिल्हा अतिरिक्त समादेशक पदी नियुक्ती करण्यात आली आहे विशेष म्हणजे किशोर गायकवाड यांनी मेहकर येथे ठाणेदार आत्माराम प्रधान कार्यरत असतांना कोविडच्या काळामध्ये पोलिसांना उत्तम प्रकारे सहकार्य करून चांगल्या प्रकारची जबाबदारी पार पडली होती त्यामुळे त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन महासमादेशक रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण ऑर्गनायझेशन कोल्हापूर यांनी किशोर गायकवाड यांचे रस्ता सुरक्षा नागरी संरक्षण आपत्ती व्यवस्थापन व शैक्षणिक सामाजिक,सांस्कृतिक आणि पर्यावरण क्षेत्रातील अतुलनीय योगदान व संघटन कौशल्याचा लाभ ऑर्गनायझेशनला व्हावा या हेतूने बुलढाणा जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या,प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये रस्ता सुरक्षा व नागरी संरक्षण या विषयाबाबत प्रचार व प्रसार करण्यात यावा या हेतूने किशोर गायकवाड यांनी रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण ऑर्गनायझेशन कोल्हापूरच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून तसेच मार्गदर्शन घेऊन ऑर्गनायझेशनच्या प्रगतीसाठी व आर एस पी बाल सैनिकांच्या हितासाठी सतत प्रयत्नशील राहावे अशा शुभेच्छा सुद्धा नियुक्ती पत्रातून किशोर गायकवाड यांना दिलेल्या आहेत या आर्गनायझेशनचे संस्थापक अध्यक्ष आर वाय पाटील कोल्हापूर,उपाध्यक्ष संजय भैलुमे, महासमादेशक तथा सचिव अनिल कुंभार,उपमहासमादेशक उमेश देशमुख सातारा,कोषाध्यक्ष शिवाजी साळवी कोल्हापूर अशी कार्यकारणी असून या आर्गनायझेशनमध्ये सदस्य म्हणून अमृत बिऱ्हाडे संभाजीनगर, लक्ष्मण इंगोले बीड,रवींद्र नाईक रायगड,यशवंत गायकवाड सातारा, विलास गायकवाड ठाणे,राजेंद्र पालवे नवी मुंबई,नरेश कुमार चंदनकर अमरावती,अमोघसिद्ध पाटील मुंबई,रावसाहेब जाधव सोलापूर,विष्णू जोंधळे नंदुरबार, निलेश इंगळे बुलढाणा, गुलाबराव मदने नांदेड,अमोल जोशी नाशिक, पंकज ठाकरे वर्धा,पूर्वा गुरव रायगड, श्रीमती माधवी पांढरकर पुणे अशी एकंदरीत कार्यकारणी आहे.
किशोर गायकवाड यांच्या नियुक्ती पत्राच्या प्रती जिल्हा पोलीस अधीक्षक बुलडाणा व शिक्षणाधिकारी माध्यमिक, प्राथमिक जिल्हा परिषद बुलढाणा यांना पाठविण्यात आलेल्या आहेत.