बुलढाणा
*आज सभागृहात बुलढाणा मतदार संघ तसेच जिल्ह्यासह राज्यातील महत्त्वाच्या विकास प्रश्नांवर धर्मवीर आमदार संजय गायकवाड यांनी आवाज उठवला!*
नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान, बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी म्हणून बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांनी *राज्य शासनाच्या नगर परिषद, नगरपंचायत तसेच आरोग्य विभागाशी संबंधित विविध प्रश्न सभागृहात मांडले.*
*प्रमुख मागण्या आणि विषय:*
1️⃣ *नगर परिषद व नगरपंचायतींचा विकास आणि आर्थिक अडचणी:*
– राज्यातील ४५० पेक्षा जास्त नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या निधीच्या माध्यमातून दरवर्षी कोट्यवधी रुपयांची कामे केली जातात.
– मात्र, या विकासकामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा महाराष्ट्राचे प्राधिकरणांकडून तांत्रिक मंजुरी घेण्यासाठी नगरपरिषदांना १% ते १.५% शुल्क भरावे लागते.
– यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल नगर परिषदांना विकासकामे करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
– *मागणी:*
– तांत्रिक मंजुरीसाठी नगर परिषदा आणि नगरपंचायतींमध्ये कार्यरत तांत्रिक अधिकाऱ्यांना थेट अधिकार प्रदान करावेत.
– रु. ५० लाखांपर्यंतच्या कामांसाठी विनाशुल्क तांत्रिक मंजुरी देण्याचा अधिकार देण्यात यावा.
– यामुळे नगरपरिषदेच्या निधीची बचत होऊन स्थानिक विकासासाठी अधिक निधी उपलब्ध होईल.
2️⃣ *बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या सुधारणा:*
– जिल्हा सामान्य रुग्णालयाची जुनी प्रशासकीय इमारत अत्यंत जीर्ण असून, नवीन प्रशासकीय इमारत उभारणे गरजेचे आहे.
– जिल्हा सामान्य रुग्णालय अंतर्गत **ट्रॉमा केअर युनिट**चे स्वतंत्र स्वरूपात रुपांतर करून *लाईफ सपोर्ट सेंटर* उभारावे.
– ग्रामीण रुग्णालय मोताळा येथे स्वतंत्र ट्रॉमा केअर युनिट मंजूर करावे.
– बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर, नांदुरा, मोताळा भागांमध्ये किडनीचे आजार वाढत असल्याने डायलिसिस युनिट उभारावे.
– मानसिक आरोग्य केंद्रासाठी नवीन अद्यावत इमारत आणि ३० बेडची क्षमता वाढवावी.
3️⃣ *स्वास्थ्य कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने आणि सुविधा:*
– जिल्हा आरोग्य संस्थेतील कर्मचाऱ्यांसाठी शासकीय निवासस्थाने उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
– *अधिग्रहीत नर्सिंग प्रशिक्षण केंद्रासाठी नवीन इमारत व विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह उभारण्याची मागणी केली.*
4️⃣ *इतर महत्त्वाच्या मागण्या:*
– जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद, नगरपंचायतींसाठी अधिक अधिकार प्रदान करून विकासकामे अधिक गतिमान करावीत.
– सार्वजनिक आरोग्य, शिक्षण आणि मूलभूत सुविधांच्या उपलब्धतेसाठी तातडीने पावले उचलावीत.
*सभागृहात बुलढाणा जिल्ह्याच्या जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आज या सर्व मागण्या धर्मवीर आमदार श्री संजूभाऊ गायकवाड यांनी मांडल्या. विकासाचा मार्ग सुकर करण्यासाठी आणि लोककल्याणासाठी सदैव प्रयत्नशील असल्याचे सांगितले.*