कंत्राटी कामगार संघटने दिले मनसे तालुकाध्यक्ष अमोल रिंढे पाटील यांना निवेदन..
स्मार्ट मीटरवर बंदी घालून कामगाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबध्द : अमोल रिंढे पाटील
बुलढाणा : महिन्यापासून संबंधित ग्राहकांच्या फॉल्टी मीटर्सच्या जागी नवीन मीटर म्हणून स्मार्ट मीटर लावण्याचा सपाटा महावितरण कडून केला जात असून, भविष्यात हे रिचार्जबल मीटर सामान्य ग्राहकांना न परवडणारे असून, जेवढ्या पैशांचे रिचार्ज संबंधित ग्राहकाने केलेले असेल, तेवढीच वीज त्या ग्राहकास वापरता येणार आहे, भविष्यात त्याचे वाईट दुष्परिणाम सर्वसामान्य विजग्राहकास भोगावे लागतील. तसेच महाराष्ट्र राज्य मीटर रीडर कंत्राटी कामगारी संघटनेवर उपासमारीची वेळ येणार असल्याने कंत्राटी कामगार संघटनेने मनसे तालुकाध्यक्ष अमोल रिंढे पाटील यांना २३ जानेवारी रोजी निवेदन देऊन स्मार्ट मीटर बंद करण्याची मागणी केली. यावर अमोल रिंढे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत स्मार्ट मीटरवर बंदी घालून कामगाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबध्द असल्याची ग्वाही दिली.
यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी बोलतांना अमोल रिंढे पाटील म्हणाले की, हा अतिसंवेदनशील असा मुद्दा आहे, कंत्राटी स्वरूपात का असेना, पण.. महावितरण समवेतची जी कामे स्थानिक कामगारांकरवी आजतगायत केली जात आहेत, त्या भरवशावर हजारो घरात चुली पेटतात. हे विसरून चालणार नाही. कळीचा मुद्दा हाच आहे की, जर भविष्यात महावितरण करवी जर स्मार्ट मीटर घरोघरी लावले गेले तर कंत्राटी कामगार जे आजमितीला मीटर रिडींग, वीज बिलदेयके वितरणाची कामे करून तूर्तास का होईना, पण बेरोजगारी वर मात करत आपलं, आणि आपल्या परिवाराचे पालनपोषण करत आहेत. त्यांचा रोजगार हिसकावला जाऊन त्यांच्या पोटावर उपासमारीचा जीवघेणा हल्ला होईल. तसेच परिणामस्वरूप बेरोजगारी पण वाढेल. यामुळे स्मार्ट मीटरवर बंदी घालण्यासाठी मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री यांची लवकरात लवकर भेट घेऊन स्मार्ट मीटरवर बंदी घालण्याची मागणी करणार असल्याचे अमोल रिंढे पाटील यांनी सांगितले.
मनसे तालुकाध्यक्ष अमोल रिंढे पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या या बैठकीला एम.एस.ई.डी.सी.एल मीटर रीडर कंत्राटी कामगार संघटनेचे राज्य अध्यक्ष रमेश जांगळे, उपाध्यक्ष मंगेश कवडे, सचिव दिपक बघेले, कोषाध्यक्ष सुधिर बारसागडे यांच्या मार्गदर्शनात अक्षय महाले संतोष वानखेडे संतोष पांडे गणेश पांडवकर तौशिफ शेख मो.नाझिम जावेद खान विकास क्षीरसागर धीरज देशमुख विजय गावंडे प्रशांत ताडे यांच्यासह कंत्राटी कामगार संघटनेचे शेकडो कामगार उपस्थित होते.