बुलढाणा
*माता रमाई आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने.. गायिका भाग्यश्री इंगळे यांचा गीत कार्यक्रम…*
त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीच्या निमित्ताने समस्त उपासीका संघ व दी बुद्धिस्ट ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट, व लोकराजा शाहू फाउंडेशन बुलढाणा यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा माता रमाई जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व माता रमाई यांच्या जयंतीच्या निमित्ताने गेल्या पाच वर्षांपासून महिलांच्या विविध सांस्कृतिक व बौद्धिक स्पर्धा घेऊन ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी केल्या जाते. यावर्षी सुद्धा रविवार २६ जानेवारी रोजी या जयंती उत्सवात प्रारंभ झाला. त्या स्पर्धांचा समारोप व माता रमाई आंबेडकर यांच्या जयंती दिनी होणार आहे.
शुक्रवार ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता गांधी भवन जयस्तंभचौक बुलढाणा येथे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका तुझ्या रक्तामधला भीम पाहू दे… बापाचा कालचा रुबाब आता दिसू लागला पोरात… या प्रसिद्ध गाण्यांच्या गायिका भाग्यश्री इंगळे यांच्या बुद्ध भीम गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन दिशा अर्बनच्या अध्यक्षा जयश्री शेळके या करणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हाधिकारी रमेश घेवंदे हे राहणार आहेत. तर प्रमुख उपस्थितीत दादासाहेब काटकर, दामोदर बिडवे, डॉ. राजेश्वर उबरहंडे, पत्रकार रणजीतसिंग राजपूत, प्रशासन अधिकारी संजय जाधव, प्रा. डी. आर. माळी, बी. के. इंगळे, डॉ. आशिष खासबागे, कुणाल पैठणकर, नंदिनी टारपे, सारिका घेवंदे, मोनिका साळवे, डॉ. अस्मिता मनवर, व बुलढाणा शहरातील समस्त उपासिका संघाच्या प्रतिनिधी स्वरूपात प्रत्येक नगरातील महिला यांची उपस्थिती राहणार आहे. तरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त उपासिका संघ, दि बुद्धिस्ट ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट व लोकराजा शाहू फाउंडेशन बुलढाणाच्या वतीने करण्यात आले आहे.