5.4 C
New York
Friday, March 14, 2025

Buy now

spot_img

*स्व. हेरंब देवल स्मृती शिक्षण सहकार्य योजना* सद्या 10 वित असणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा 17 मार्च 2025 रोजी संपणार आहे. त्यानंतर रविवार दिनांक 6 एप्रिल 2025 ला 10 वि च्या विज्ञान, गणित, इंग्रजी या विषयावर आधारित 100 गुणांची लेखी निवड चाचणी परीक्षा

*स्व. हेरंब देवल स्मृती शिक्षण सहकार्य योजना*

सद्या 10 वित असणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा 17 मार्च 2025 रोजी संपणार आहे. त्यानंतर रविवार दिनांक 6 एप्रिल 2025 ला 10 वि च्या विज्ञान, गणित, इंग्रजी या विषयावर आधारित 100 गुणांची लेखी निवड चाचणी परीक्षा ( मराठी व इंग्रजी दोन्ही माध्यमातून ) घेतली जाईल. त्यात पास झालेल्या विद्यार्थ्यां ची तोंडी परीक्षा, मुलाखत, गृहभेट घेतली जाईल.या मध्ये पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यां ची गरजेनुसार बुलडाणा येथे 11 वी व 12 वी साठी भोजन, निवास, कॉलेज, पुस्तके यांची व्यवस्था करण्यात येईल. तसेच 12 वी नंतरच्या शिक्षणासाठी सुद्धा मार्गदर्शन व आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न केला जाईल. ज्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे त्यांनी अधिक माहितीसाठी व गुगल फॉर्म ची लिंक मिळवण्यासाठी 9422180371,
9960871569, 9881088503 या क्रमांकावर संपर्क साधावयाचा आहे.

*स्व.हेरंब देवल स्मृती शिक्षण सहकार्य योजनेच्या आतापर्यंतच्या वाटचाली विषयी थोडेसे* :- योजनेचे हे पाचवे वर्ष आहे. सध्या 5 विद्यार्थी 12 वी परीक्षा देत आहेत तर 8 विद्यार्थी 11 वी मध्ये आहेत तर एक विद्यार्थी नीट रिपीट करत आहेत .या आधी 25 विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला आहे. त्यातील 7 विद्यार्थी MBBS, 1 विद्यार्थी BAMS, 1 विद्यार्थी Veternary , 1 विद्यार्थी IIT, 1 विद्यार्थी नेव्ही, 12 विद्यार्थी नामांकित कॉलेज मध्ये इंजिनिअरिंग करत आहे तर एक विद्यार्थी हा UPSC ची तयारी करत आहे. हे सर्व विद्यार्थी बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आहेत.
*विशेष:-* योजनेमध्ये निवडल्या गेलेल्या विद्यार्थिनींची राहण्याची व्यवस्था प्रा. उल्का अंतरकर मॅडम यांनी स्वतःहून उचलली आहे.
*महत्त्वाचे:-* अश्याच विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घ्यावा जे अभ्यासामध्ये होतकरू आहेत परंतु आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत .कारण परीक्षेमध्ये जरी जास्त मार्क पडले तरी देखील आम्ही चौकशी करून तसेच त्याचे घरी भेट घेऊन खरंच तो या योजनेसाठी योग्य आहे का हे तपासतो व योग्य वाटल्यासच त्याची निवड करतो.

Related Articles

ताज्या बातम्या