2.1 C
New York
Thursday, December 18, 2025

Buy now

spot_img

ईद मिलन कार्यक्रमात घडले सामाजिक एकोप्याचे दर्शन जिल्हा पत्रकार संघाच्या आयोजनाला कौतुकाची थाप

ईद मिलन कार्यक्रमात घडले सामाजिक एकोप्याचे दर्शन

जिल्हा पत्रकार संघाच्या आयोजनाला कौतुकाची थाप

समाजात विष कालवून जाती-धर्मा मध्ये संघर्ष होऊन अशांतता पसरावी यासाठी समाज कंटक प्रयत्न करत असतात.अशा आसामजीक तत्वावर आपण सर्वांनी लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
पत्रकार आपल्या लेखणीतून सामाजिक सलोखा जोपासत असतात परंतु या ईद-मिलन कार्यक्रमाच्या माध्यमातून खरंच बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाने आगळावेगळा आदर्श निर्माण केल्याची भावना अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतात व्यक्त करून जिल्हा पत्रकार संघाच्या या कार्यक्रमाला कौतुकाची थाप दिली आहे.
बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने ईद मिलनचा कार्यक्रम शुक्रवारी, ४ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता पत्रकार भवन बुलढाणा येथे आयोजित करण्यात आला होता.ईद हा मुस्लिम समाजाचा मोठा सण दरवर्षी उत्सहात साजरा केला जातो,बुलडाणा शहर हे हिंदु-मुस्लिम एकतेचे कायम प्रतीक राहिले असून शहरामध्ये हिंदु-मुस्लिम धर्मिय गुण्यागोविंदाने राहतात.आपल्या पूर्वजांनी जपलेला बंधुभावाचा वारसा पुढे ही जपला जात आहे.यावेळी शहरातील आणि सर्व जाती धर्माच्या नागरिकांसाठी ईद मिलनचे आयोजन करण्यात आले होते.ईदनिमित्त शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर एकत्र येऊन आपसात हितगुज साधावे तसेच सामाजिक सलोखा आणि बंधुभाव जपला जावा तसेच ईद निमित्ताने समाजातील संबंध गोड करण्याचा प्रयत्न व्हावा या उद्देशाने बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजीतसिंग राजपूत, सरचिटणीस कासिम शेख विभागीय संघटक रहेमत अली शाह यांच्या संकल्पनेतून ईद मिलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलं होता. यावेळी परिसरातील, नागरिकांसह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक,प्रशासकीय वैदयकिय, व्यापारी, पोलीस प्रशासन आदी क्षेत्रातील मान्यवरांची या कार्यक्रमास उपस्थिती होती. यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजीतसिंग राजपूत यांनी सांगितले की,रमजान ईद हा सण प्रेम, बंधुभावाची शिकवण देणारा आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये माजी आ. विजयराज शिंदे,बुलढाणा नगर परिषदचे मुख्याधिकारी गणेश पांडे, शिक्षणाधिकारी अनिल आकळ,जिल्हा माहिती अधिकारी पवनकुमार राठोड,एड.जयश्री शेळके,एड.विजय सावळे, अनुजा सावळे, दत्ता काकस, राजेश देशलहरा, पत्रकार राजेंद्र काळे, चंद्रकांत बर्दे, शिवाजी तायडे,अब्दुल रहीम,डॉ. गणेश गायकवाड, प्रमोदसिंह दुबे,घनशाम चोपडा,माजी नगरसेवक जाकिर कुरेशी,डॉ. राजेश जतकर,टिकम सेठ, जितेंद्र जैन,दिलीप कोठारी, प्रा.डी.एस.लहाने सर,डॉ. आशिष खासबागे,डॉ. प्रफुल जैस्वाल,आंनद संचेती,डॉ. सचिन झगडे.एड.सतीशचंद्र रोठे,डॉ. प्रशांत पाटील, डॉ.जतकर, डॉ.सैयद अनिस,डॉ.माधवी जवरे,मो.सोफियान,अनिल नरोटे,विनोद जवरे यांच्या सह अनेक मान्यवरांनी कार्यक्रमात हजेरी लावली.
जिल्हा व शहर पत्रकार संघाचे पदाधिकारी , ब्रम्हानंद जाधव,इसरार देशमुख,राम हिंगे,शेख इद्रीस,विनोद सावळे,अजय राजगुरे, शाकिर हुसैन,सुनील मोरे,अभिषेक वरपे,अजय काकडे सह अब्दुल राजिक, साहेबज शाह शेख महेबूब, मुझफ्फर शाह,तोफीक शाह,सोहेल शाह यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

Related Articles

ताज्या बातम्या