18 C
New York
Sunday, October 25, 2026

Buy now

spot_img

शेगाव येथे राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेचा थाटात समारोप.. समारोप कार्यक्रमास राज्याचे क्रीडामंत्री माणिक कोकाटे, आमदार प्रवीण दरेकर तसेच केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती

बुलढाणा

*शेगाव येथे राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेचा थाटात समारोप..

समारोप कार्यक्रमास राज्याचे क्रीडामंत्री माणिक कोकाटे, आमदार प्रवीण दरेकर तसेच केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती

 

 

शेगाव येथील राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेचा आज उत्साहात व जल्लोषात समारोप झाला. या समारोप कार्यक्रमास राज्याचे क्रीडामंत्री माणिक कोकाटे, आमदार प्रवीण दरेकर तसेच केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

स्पर्धेच्या अंतिम दिवशी खेळाडूंमध्ये अंतिम लढती खेळविण्यात आल्या. अंतिम सामन्यांमध्ये खेळाडूंनी उत्कृष्ट तंत्र, ताकद व खेळभावना यांचे दर्शन घडवत प्रेक्षकांची मने जिंकली. चुरशीच्या व थरारक बॉक्सिंग लढतींमुळे संपूर्ण मैदानात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी मान्यवरांनी खेळाडूंना मार्गदर्शन करत खेळातून शिस्त, संयम आणि आत्मविश्वास वाढतो, असे सांगितले. राज्यस्तरीय स्पर्धांमुळे ग्रामीण व नवोदित खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळते, असेही त्यांनी नमूद केले.

समारोपप्रसंगी विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना पदके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. शेगाव येथे पार पडलेल्या या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेमुळे क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या