बुलढाणा
बुलढाणा पोलिसांनी भडगाव वासियांची जिल्हाधिकारी यांची भेट घडवून आणली.. ग्रामस्थांनी बुलढाणा पोलिसांचे आभार मानले..
तापमान जास्त असल्याने कडक उन्हात आलेल्या असंख्य महिलांना शहर पोलीस ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांनी पाण्याची व्यवस्था केली..
ठाणेदार व त्यांची टीम यांनी दाखवलेल्या सौधर्य वागणुकीची सर्वत्र चर्चा …
भडगाव वासियांनी
पोलिसाप्रती सदभावना व्यक्त केल्या ..
स्मशानभूमीचा प्रश्न तातडीने निकाली काढू ,जिल्हाधिकारी यांनी दिले आश्वासन..
चिखली तालुक्यातील भडगाव येथील असंख्य महिला व पुरुष पालक मंत्री मकराड जाधव यांना आपल्या गावातिल् समाशानभूमीचा प्रश्न घेऊन भेटण्यासाठी जिल्हाधिकारी कार्याल्यात आले होते.. कडक उन्हात् गे भडगाव वासी जेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले तेव्हा बुलढाणा ठाणेदार नरेंद्र ठाकरे व त्यांची टीम यांनी त्यांच्याशी संवाद साधला व त्यांची समस्या जाणून घेतली.. तिकडे जिल्हाधिकारी कार्याल्याच्या सभागृहात् सर्व अधिकार्यांची पालकमंत्री आढावा बैठक घेत असल्याने भडगाववासियांना बाहेर थांबविण्यात आले अश्यातच 42 अशन तापमानात् ग्रामस्थ कार्यालया च्या परिसरातील झाडाखाली थांबले असता सर्वांना तहान लागल्याचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांच्या लक्षात आले त्यांनी तातडीने त्यांच्या टीम ला पाण्याची व्यवस्था करण्याचे सांगितले पोलीस कर्मचाऱ्यांनी दोन जार थंड पाणी आणून त्यांना पाजले .. त्यांची तहान भागविली.. त्यामुळे ग्रामस्थ महिला शांत झाले.. तसेच ठाणेदार यांनी भडगाव वासी यांची जिल्हाधिकारी किरण पाटील यांची भेट घडवून आणली जिल्हाधिकारी हे बाहेर आले व त्यांज ग्रामस्थांची समस्या जाणून घेतली व तातडीने स्मशान भूमीचा प्रश्न निकाली काढल्या जाईल असे आश्वासन दिले.. पोलिसांनी च्या या कार्यशायलीची चर्चा ग्रामस्थांमध्ये दिसून आली.. बुलढाणा पोलिसांनी ग्रामस्थाप्रती दाखवलेली सौजन्याची वागणुकीमुळे ग्रामस्थानी ठाणेदार नईंदर ठाकरे व त्यांच्या टीम चे आभार मानले.. गामस्थांची मागणी समस्या मार्गी लागणार असल्याने ग्रामस्थांही खुश होऊन गावाकडे रवाना झाले..

