बुलढाणा
*जनसुरक्षा कायद्याच्या नावाखाली अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध आणणारा कायदा रद्द.. पत्रकारांनी केली मागणी व केले निदर्शने ..*
अँकर
महाराष्ट्र राज्य सरकार नव्याने लागु करीत असलेल्या पत्रकारांची मुसकट दाबी करणारा जनसुरक्षा कायद्याच्या नावाखाली अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध आणणारा कायदा रद्द करा या मागणीसाठी जिल्ह्यातील पत्रकारांनी खामगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्याल्यासमोर निदर्शने करीत घोषणाबाजी केली… लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ रस्त्यावर उतरला असून सरकार आता जनसुरक्षा कायद्याच्या नावाखाली अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध आणत आहे त्यामुळे देशात हुकूमशाहिकडे वाटचाल तर करीत नाही ना असा प्रश्न उपस्थित केला गेलाय..सरकार या कायद्या मुळे पत्रकारांची व प्रसार माध्यमांची मस्कट दाबी करीत आहे त्यासाठी हा कायदा रद्द करण्यात यावा यासाठी निदर्शने करण्यात आली त्या आशयाचे निवेदन राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले आहे..

