बुलढाणा
*मे महिन्यापासून शहराला दररोज पाणी पुरवठा होईल… आ संजय गायकवाड आश्वासन..*
गत 35 वर्षांपासून बुलढाणा शहराला 6 ते 7 दिवसानंतर पाणी पुरवठा केला जात आहे.. कायमस्वरूपी पाणी पुरवठा व्हावा ही सातत्याने बुलढाणा शहरवासियांनी केली आहे.. तेव्हा 12 वर्षांपूर्वी खडकपूर्णा धरणावरून 168 कोटी रुपयाची कायम स्वरूपी पाणी पुरवठा योजना मंजूर करण्या आली होती आता ती योजना कार्यनवीत होणार असून प्रत्यक्षात दररोज पाणी पुरवठा होईल असे आश्वासन आ संजय गायकवाड यांनी दिले आहे.. आता काही दिवसापूर्वी खडकपूर्णा धरणातील पाणी बुलढाण्यातील येळगाव धरणावरील फिल्टर प्लांट वर आणण्यात आ संजय गायकवाड हे यशस्वी झाले असून त्याचे जलपूजन सुद्धा करण्यात आले आहे… दरवर्षी पाणी टंचाई च्या झळा बुलढाणेकरांना सोसाव्या लागत आहेत आता यावर्षी शहरवासियांना दररोज किंवा किमान तिसऱ्या दिवशी तरी पाणी पुरवठा व्हायला पाहिजे अशी भावना बुलढाणेकरांनी व्यक्त केली आहे.. सम्राट अशोक नगर भागातील काही महिला पुरुष आ संजय गायकवाड यांना पाणी समस्ये विषयी चर्चा केली तेव्हा आ संजय गायकवाड यांनी येत्या 1 मे पासून शहरवासियांना आपण दररोज पाणी देऊ असे आश्वासित केले.. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे पुढील वर्षी पासून पाणी टंचाई ला सामोरे जावे लागणार नसल्याचे चित्र दिसत आहे

