15.7 C
New York
Monday, June 16, 2025

Buy now

spot_img

महिला च्या मदतीसाठी बुलढाणा पोलिसांनी केले हेल्पलाईन लिंक चे लोकार्पण…* *डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून पोलीस अधीक्षकांनी हेल्पलाईन लिंक केली कार्यानवीत ..* राज्यातील हा पाहिलाच उपक्रम..

बुलढाणा

*महिला च्या मदतीसाठी बुलढाणा पोलिसांनी केले हेल्पलाईन लिंक चे लोकार्पण…*

*डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून पोलीस अधीक्षकांनी हेल्पलाईन लिंक केली कार्यानवीत ..*

राज्यातील हा पाहिलाच उपक्रम..

महिला, मुली, जेष्ठ नागरीक यांना तात्काळ मदत मिळण्याकरीता हेल्प लाईन लिंक कार्यान्वीत–जिल्हा पोलीस अधीक्षक, विश्व पानसरे

भारतीय संविधानाचे जनक, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधुन आज दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी विश्व पानसरे, जिल्हा पोलीस अधीक्षक, बुलढाणा यांचे संकल्पनेतुन महिला, मुली, जेष्ठ नागरीक यांना तात्काळ पोलीस मदत, कायदेशीर मार्गदर्शन, घरबसल्या मोबाईलद्वारे तक्रार दाखल करण्याची सुविधा उपलब्ध व्हावी या उदात्त हेतुने हेल्पलाईन लिंक कार्यान्वीत करण्यात आलेली आहे. या लिंक द्वारे काही मिनिटात पोलीस महिलांच्या मदतीला पोहोचतील.. राज्यातील हा पहिला उपक्रम बुलढाणा जिल्ह्यात राबविण्यात येत आहे…

महिलांची सुरक्षा महत्ववाची आहे… त्याचं उद्देशाने जिल्हा पोलीस अधीक्षकांनी हा सक्षम उपक्रम राबविम्याचा निर्णय घेतला आहे .

बुलढाणा जिल्ह्यातील सर्व महिला, मुली, जेष्ठ नागरीक यांना बुलढाणा पोलीस दलाने कार्यान्वीत केलेली हेल्पलाईन लिंक वर आपले रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. हेल्पलाईन लिंक वर रजिस्ट्रेशन करतांना सर्वप्रथम आपली प्रोफाईल बनवा. त्यामध्ये आपले संपुर्ण नाव, संपर्क क्रमांक, पोलीस स्टेशन, गावाचे नाव इत्यादी माहिती अचुक भरुन तयार करणे आवश्यक आहे. हेल्पलाईन लिंकवर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पुढीलप्रमाणे सुविधा तात्काळ प्रभावाने उपलब्ध होणार आहेत.

महिलांसाठी शिघ्र पोलीस मदत

1) दामिनी पथक

4) महिलांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन

2) महिलांसाठी वैद्यकीय मदत 3) महिलांसाठी हेल्पलाईन

5) महिलांसाठी ऑनलाईन तक्रार

जेष्ठ नागरीकांसाठी मदत

1) जेष्ठ नागरीकांसाठी शिघ्र पोलीस मदत

2) जेष्ठ नागरीकांसाठी हेल्पलाईन

3) जेष्ठ नागरीकांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन

4) जेष्ठ नागरीकांसाठी ऑनलाईन तक्रार

5) जेष्ठ नागरीकांसाठी वैद्यकीय मदत

ऑनलाईन पोलीस तक्रार नोंदणी- सुलभ व तत्काळ सेवा

तक्रार नोंदणी फॉर्मचे तपशीलः

1. पूर्ण नावः

1. नागरीकाचे पूर्ण नाव लिहायचे आहे.

2. योग्य ओळखीसाठी आवश्यक.

2. संपर्क क्रमांकः

1. मोबाईल किंवा दूरध्वनी क्रमांक.

2. तक्रारीसंदर्भात पोलीस संपर्क साधू शकतील.

3. पोलीस स्टेशन निवडाः

1. ड्रॉपडाऊन मेन्यूद्वारे संबंधित पोलीस ठाण्याची निवड.

2. योग्य विभागात तक्रार पोहचविण्यासाठी आवश्यक.

4. ऑडिओ तक्रार सुविधाः

1. रेकॉर्ड सुरू करा – तक्रार स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड करता येते.

2. रेकॉर्ड थांबवा – तक्रार पूर्ण झाल्यावर रेकॉर्डिंग थांबवता येते.

3. ही सुविधा वाचू न शकणाऱ्या किंवा लिहायला अक्षम व्यक्तींसाठी उपयुक्त.

5. तक्रार लेखी स्वरूपात नोंदवाः

1. तक्रारीचा सविस्तर तपशील लिहिता येतो.

2. घटनास्थळ, वेळ, संबंधित व्यक्ती यांचा उल्लेख करता येतो.

6. ‘तक्रार सबमिट करा’ बटणः

1. सर्व माहिती भरल्यानंतर तक्रार अधिकृतरित्या सबमिट करण्यासाठी वापरायचे बटण.

सदर लिंकवर रजिस्ट्रेशन पुर्ण झाल्यानंतर या प्रणालीमधुन जवळचे पोलीस स्टेशन निवडु शकतो. पोलीस स्टेशन निवडल्यानंतर संबंधीत पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांची संपुर्ण माहिती मोबाईल स्क्रिनवर दिसुन येते. संपर्क बटनावर क्लिक करुन थेट कॉल करता येतो. लोकेशन पहा बटनावर क्लिक केल्यास संबंधीत पोलीस स्टेशनचे लोकेशन Google Map द्वारे उघडता येते. लिंकच्या मदतीने बुलढाणा जिल्ह्यातील महिला, मुली, जेष्ठ नागरीक यांना सुविधांचे सुलभीकरण होणार आहे. त्यामुळे सर्व महिला, मुली, जेष्ठ नागरीक यांनी सुविधेचा वापर करण्याकरीता हेल्पलाईन लिंकवर रजिस्ट्रेशन करण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक, श्री. विश्व पानसरे यांनी केले आहे.

पोलीस अधीक्षक, बुलढाणा करीता

Related Articles

ताज्या बातम्या