बुलढाणा
*राजुर घाटात दुधाचा ट्रक पलटी, दोघेजण गंभीर जखमी..*
*सुदैवाने जीवित हानी टळली:*
धाड येथील अमर डेरी चा दूध वाहतूक करणारा ट्रक एअर ब्रेक फेल झाल्यामुळे मलकापूर रोडवरील राजूर घाटातील देवीच्या मंदिराच्या अलीकडे दुधाचा ट्रक पलटी झाल्याची दुर्दैवी घटना घडली.. सुदैवाने ट्रक डाव्या बाजूला पलटी झाल्यामुळे मोठी हानी टळली. ड्रायव्हर व क्लिनर हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत सुदैवाने जीवित हानी टळली आहे. घटनेची माहिती मिळताच अड सतीश रोठे व पोलीस घटनास्थली पोहोचले त्यांनी तातडीने जखमीना जिल्हा सामान्य रुग्णाल्यात भरती केले आहे …

