-1.6 C
New York
Monday, December 15, 2025

Buy now

spot_img

अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी अंत्री खेडेकर आणि असोला बु. गावांचा समावेश करावा.,,,

अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी अंत्री खेडेकर आणि असोला बु. गावांचा समावेश करावा.,,,

————————————–ऑगस्ट २०२४ ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत अतिवृष्टीसदृश पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक भागांत शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. याच कालावधीत मौजे अंत्री खेडेकर आणि असोला बु. (ता. चिखली) या गावांतील शेतपिकांचेही अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झाले. मात्र, महसूल प्रशासन आणि कृषी विभागाने या नुकसानीबाबत शासनाकडे कोणतीही माहिती सादर न केल्याने या गावांतील शेतकरी अतिवृष्टीच्या शासकीय मदतीपासून वंचित राहिले आहेत. तसेच, मेरा खुर्द महसूल मंडळांतर्गत मेरा बुद्रूक आणि गुंजाळा या गावांचा अतिवृष्टीग्रस्त गावांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. परंतु त्याच महसूल मंडळातील लगतच्या अंत्री खेडेकर आणि असोला बु. गावांचा समावेश नसल्याने शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. मौजे अंत्री खेडेकर व असोला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तरी या गावांचा अतिवृष्टीग्रस्त गावांच्या यादीत समावेश करून. शासनाच्या अतिवृष्टी नुकसान भरपाई निकषांनुसार, हेक्टरी शेतपिक नुकसानीची आर्थिक मदत द्यावी. अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकरते कार्तिक खेडेकर , विठ्ठल खेडेकर यांनी तहसीलदार चिखली यांच्याकडे केली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या