बुलढाणा
*स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत ग्राहक सुविधेपासून वंचित…*
*बँकेत तक्रार पेटी नाही, ग्रामीण भागातील नागरिकांची हेळसांड …*
*पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, महिलासाठी शौचालय, तक्रार पेटी नाही…*
केंद्र शासनाचे धोरणच आहे के नागरिकांनी राष्ट्रीयकृत बँकेत आपल्या ठेवी ठेवाव्यात .. त्याचं धोरणा नुसार जेव्हा ग्राहक राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडण्यासाठी जातो तेव्हा त्याला कुठलीच सुविधा मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे… ग्रामीण भागातील नागरिकाचा विश्वास आजही कायम असुल्याने जिल्ह्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बुलढाणा स्थित मुख्य शाखेत खाते उघडण्यासाठी जातो तेव्हा त्याला प्राथमिक आवश्यकता असते ती खाते उघडण्याचा अर्ज भरण्याची… अर्ज हा संपूर्ण इंग्रजी मध्ये असतो ते भरून देण्यासाठी बँकेतील प्रत्येक खिडकी समोर जाव लागत तर काही एजन्सीचे कंत्राटी वर काम करणारे युवक युवती तिथे बसलेल्या असताना तेही त्यांचा अर्ज कोणीही भरून देत नसल्याने शेवटी आपल्या गावी परत जाव लागत असल्याचे चित्र दिसून आले आहे… बँक मॅनेजर व्यवस्थापक हे त्यांच्या कॅबिन मध्ये दिसून येत नाहीत… खिडकीतील कायमस्वरूपी कर्मचारी हे तर ग्राहकांना अश्या शब्दात अपमानात्मक बोलतात की ते उपकाराची भाषा वापरतात…. त्यामुळे सर्व ग्राहकांची हेळसांड केल्या जात आहे …
ग्राहक हे दैवीरूपी असल्याचे म्हटले जाते मात्र बँकेत हे उलट दिसून येते आहे… खाते धारकाना दिवसभर रांगेत बसविल्या जाते त्यानंतर जेव्हा नंबर येतो तेव्हा त्या कर्मचाऱ्याचे मधली सुटी होते ते जेवायला गेले सांगण्यात येते तर ते दोन तासाने आल्यानंतर काहीही कारण सांगून हे काम होत नाही .. अस सांगण्यात येते .. मोठा मनस्ताप सहन करून खाते धारकाना परताव लागते…
या राष्ट्रीयकृत बँकेत कुठे तक्रारपेटी नाही….कोणाकडे तक्रार द्यायची अश्या कर्मचाऱ्याची नेमणूक नाही… तसेच दिवसभर ग्राहकांची गर्दी असते तिथे त्यांच्या साठी पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही तसेच महिलासाठी शौचालंय नाहीत… असुविधा असलेली बुलढाण्यातील मुख्य शाखा स्टेट बँक आहे… रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी अश्या बँकेतील कर्मचारी व अधिकार्यावर कारवाई करावी अशी मागणी ग्राहकांनी शिखर बँकेकडे केली आहे….

