झारखंडचे खासदार निशिकांत दुबे यांची खासदारकी रद्द करून कठोर शासन करा – डॉ. गोपाल बछिरे
खासदार निशिकांत दुबे यांनी बनावट खोटी एमबीए ची डिग्री संसदेत सादर केली व महाराष्ट्र विषयी वल्गना करून महाराष्ट्राचा तसेच मराठी माणसाचा अपमान केल्याबद्दल त्यांची खासदारकी रद्द करून कठोर शासन करण्यात यावी अशी मागणी शिवसेना उ.बा.ठा. चे जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे यांनी राष्ट्रपती यांच्याकडे निवेदना द्वारे करण्यात आली
झारखंड चे खासदार निशिकांत दुबे यानी एक तर आपले शिक्षण एम.बी.ए. असल्याचे संसदेत लेखी प्रतिज्ञापत्र दिले आहे व ही डिग्री दिल्ली विद्यापीठाची असल्याचे शपथेवर शपत पत्रात सांगितले, पण ही डिग्री खोटी बनावट असल्याचे स्वतः दिल्ली विद्यापीठानेच स्पष्ट केले आहे. या खासदाराने संसदेची फसवणूक केल्याबद्दल त्याचे संसद सदस्यत्व रद्द होणे क्रमप्राप्त आहे. त्याचबरोबर निशिकांत दुबे यांनी परवा महाराष्ट्रा विषयी जी गरळ ओळखली त्यात तो म्हणाला
“महाराष्ट्रात काहीही शिल्लक राहिलेलं नाही महाराष्ट्र कंगाल झालेला आहे, महाराष्ट्राच संपूर्ण वैभव संपलेल आहे, येथे कोणता मोठा उद्योग नाही, आमच्या श्रीमंतीवर तुम्ही मराठी माणसे व महाराष्ट्र जगत आहे, तुम्ही मराठी मानस महाराष्ट्र बाहेर आले तर मराठी माणसांना आपटून आपटून मारूत”
निशिकांत दुबे चे हे विधान भारतात सर्वात जास्त जीएसटी रूपाने कर देणारा एकमेव राज्याचा व छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांचा वारसा असलेल्या महाराष्ट्राचा घोर अपमान करणारे आहे आणि म्हणून खासदार निशिकांत दुबे याचे संसद सदस्य पद रद्द करून त्याला कठोर शासन व्हावे अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन लोणारचे तहसीलदार मा. भूषण पाटील यांच्यामार्फत महामहिम राष्ट्रपती यांना देण्यात आले आहे याप्रसंगी शिवसेना उभाठाचे जिल्हा संघटक प्रा.डॉ.गोपालसिंह बछिरे, तालुकाप्रमुख ॲड.दीपक मापारी, शहरप्रमुख गजानन जाधव, महिला तालुकाप्रमुख सौ. तारामती जायभाये, तालुका उपप्रमुख लीलाताई मते, ज्येष्ठ शिवसैनिक सुदन अंभोरे , प्रकाश सानप, शाम राऊत, शहर संघटक तानाजी मापारी शाहरउपप्रमुख लूकमान कुरेशी युवा सेना शहरप्रमुख श्रीकांत मदनकर, विभाग प्रमुख गोपाल मापारी, तानाजी अंभोरे, अल्पसंख्यांक सेनेचे इकबाल कुरेशी, अशपाक खान, फहीम खान, वाहतूक सेनेचे असृबा धारकर, गफ्फार शाह, लालूभाई शेख, वासिम शेख, अमोल सुटे, विजय घोडके,भारत राठोड , शमीम शेख, कलीम कुरेशी नदीम कुरेशी, मंगेश मोरे, यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते

