11.9 C
New York
Friday, December 19, 2025

Buy now

spot_img

बलिदान देऊन जर न्याय मिळत असेल तर मी तेही प्रक्रियेला समोर जाणार. –  श्रीमती, स्वाती नागरे…*

*बलिदान देऊन जर न्याय मिळत असेल तर मी तेही प्रक्रियेला समोर जाणार. –  श्रीमती, स्वाती नागरे…*

महाराष्ट्र शासन युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी स्वर्गीय कैलास अर्जुन नागरे रा.शिवणी आरमाळ यांनी शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळावे म्हणून दि.13/03/2025 रोजी बलिदान दिले आज त्याला चार महिने पूर्ण झाली तरी त्यांच्या कुटुंबाला न्याय नाही त्यांच्या सुसाईड नोटमध्ये केलेला उल्लेख की माझ्या मुलांचं व कुटुंबाचे पालकत्व मुख्यमंत्र्यांनी व उपमुख्यमंत्र्यांनी स्वीकारावे आणि ते मुख्यमंत्री साहेबांनी विधानसभेमध्ये स्वीकारल्याची घोषणा केली,पण त्याचं पुढे काय झालं ते अद्याप काहीच आम्हाला कळालं नाही म्हणून आज उपविभागीय कार्यालय सिंदखेड राजा तहसील कार्यालय देऊळगाव राजा येथे निवेदन देऊन अन्नत्याग आमरण उपोषण करणार असल्याची घोषणाच केली,……
निवेदनाद्वारे विनंती केली मला १२ दिवसाच्या आत आपल्या स्तरावर माननीय मुख्यमंत्री साहेबांची भेटीची वेळ शासकीय प्रशासकीय यंत्रणेनुसार मिळावी कारण माननीय मुख्यमंत्री साहेबांनी माझ्या कुटुंबांचे पालकत्व स्वीकारले आहे त्याचे पुढे काय झाले अद्याप काहीच माहिती मला मिळाली नाही यासाठी म्हणजे सगळ्या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात येईल आणि मला व माझ्या मुलांना न्याय मिळेल याकरिता मी आपल्याकडे निवेदनाद्वारे ही वेळ मागत आहे ज्यावेळेस स्वर्गीय कैलास नागरे यांच्या अंत्यविधीसाठी व रक्षाविसर्जनासाठी सर्वच राजकीय पक्षातील. पालकमंत्री व तसेच विविध सामाजिक राजकीय संघटनेने सर्व शेतकरी संघटना यांनी भेट दिली आणि अनेक राजकीय क्षेत्रातील संघटनेने मुलांच्या शिक्षणाची ,आरोग्याची सगळी जबाबदारी उचलली पण ती सत्यात उतरली नाही म्हणून खंत व्यक्ती केली, तसेच शासकीय प्रशासनाने सुद्धा सर्वांनी येऊन मला भेट दिली सर्वांनी आश्वासन दिले पण आश्वासन पूर्ण झालेच नाही माझ्या पतीचे जे बलिदान झाले ती केवळ फक्त प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झाले प्रशासनाने त्यांच्या निवेदनाची व आंदोलनाची दखल जर घेतली असती तर ही वेळ माझ्यावर माझ्या मुलांवर आली नसती आज मला न्याय मागण्यासाठी जर मला सुद्धा अन्नत्याग आमरण उपोषण करण्याची वेळ येत असेल तर युवा शेतकरी पुरस्कार स्वर्गीय कैलास नागरे यांच्या पत्नी म्हणून मी तेही सुद्धा आंदोलन करायला तयार आहे परत राज्य सरकारला बलिदान घ्यायचे का? जर बलिदान घेऊन न्याय मिळत असेल तर त्याही सुद्धा प्रक्रियेला मी समोरे जावा असं सरकारला जर वाटत असेल तर ?याची सर्व जबाबदारी ही राज्य सरकारची असेल म्हणून अजून वेळ गेली नाही म्हणून सध्या अधिवेशन चालू आहे आणि अधिवेशनामध्ये माझ्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी व पालकत्वाची जबाबदारी ही राज्य सरकारने अधिवेशनात मांडावी आणि मला न्याय द्यावा, नाहीतर या सर्व विषयावर चर्चा करण्यासाठी आपण मला १२ दिवसाच्या आत वेळ द्यावा हीच राज्य सरकारकडे युवा शेतकरी पुरस्कार कैलास नागरे यांची पत्नी म्हणून मी या राज्य सरकारकडे हात जोडून विनंती करीते असल्याचे निवेदनामध्ये उल्लेख आहे. मला व माझ्या मुलांच्या भविष्यासाठी तरी वेळ द्या नाहीतर मी माझ्या राहत्या घरी *शिवणी आरमाळ येथे श्रीमती स्वाती नागरे माझ्या पतीच्या प्रतिमे जवळ अन्नत्याग आमरण उपोषण दिनांक २१/०७/२०२५ पासून करणार* आहे , माझ्या व माझ्या कुटुंबाच्या आरोग्याची सर्व जबाबदारी ही प्रशासनाची असेल जर बलिदान देऊन न्याय मिळत असेल तर तेही सुद्धा मी करायला तयार आहे कारण उदाहरण, माझ्या पतीने बलिदान दिल्यानंतर शिवनी आरमाळ येथील धरणावरील सर्व झाडं झुडपे काढण्यात आले तेही बलिदान दिल्यानंतरच काढण्यात आली म्हणून राज्य सरकारने माझ्यावर ती वेळ येणार नाही याची खबरदारी घ्यावी असे आव्हान श्रीमती स्वाती नागरे यांनी केली आहे

Related Articles

ताज्या बातम्या