बुलढाणा
*कृषी नवनगरांचा सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली उपसमितीची बैठक आयोजित करण्याचा पुढाकार पालकमंत्र्यांनी घ्यावा…*
*समृद्धी महामार्ग नजीक असलेल्या असंख्य शेतकऱ्यांची मागणी…*
अँकर
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्ग-कृषी समृध्दी केंद्र मौजे माळसावरगांव, घायगांव, जांबरगांव, धोत्रे व इतर कृषी नवनगरांचा सर्वांगीण विकासासाठी मा. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली उपसमितीची बैठक आयोजित करण्यासाठी व शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या मान्य करण्यासाठी पालकमंत्री या नात्याने जिल्ह्याच्या विकासात गती येण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी पालकमंत्री मकरंद जाधव यांची भेट घेऊन निवेदना द्वारे केली आहे..
२०१७-१८ पासून समृध्दी महामार्गाला १८ कृषी समृध्दी नवनगरे विकसीत करण्यासाठी शासनाने जाहिरनाम्याद्वारे ही गावे कृषी प्राधिकरण म्हणून घोषित करण्यात आली आहे. परंतू, अद्याप पर्यंत कुठलीही कार्यवाही न केल्यामूळे परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे. प्रशासकीय पातळीवर या सर्व गावांचे मुल्यांकनासह सर्व प्रस्ताव महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ यांचेकडे सादर होऊन मोठा कालावधी उलटला आहे.
रस्ते विकास महामंडळाच्या कार्यालयाकडून अप्पर सचिव, सार्वजनिक बांधकाम रस्ते-८ यांचे कार्यालयात शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या मान्य करण्यासाठीचा प्रस्ताव शिफारसीसह सादर केलेला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही याप्रश्नी मुख्यमंत्र्यांकडे निवेदन सादर करून मुख्यमंत्र्यांना उपसमितीची बैठक लावून सदर मागण्या मान्य करण्यासाठी विनंती केलेली आहे. मात्र सरकार अधिकाधिक वेळ घेत असल्यामूळे शेतकरी हवालदिल झाला असून शेतकरी आत्महत्या करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वास्तवीक पाहता, शेतकऱ्यांनी आपल्या सर्व जमीनी शासनाच्या जमीन एकत्रिकरण योजने अंतर्गत देण्याची तयारी दाखविली असतांनासुध्दा शासन याबाबतीत उदासीन असल्याचे दिसत आहे. याप्रश्नी तात्काळ आपण व्यक्तीशः लक्ष घालून मुख्यमंत्री यांना या बाबतीची तीव्रता लक्षात आणून द्यावी व उपसमितीचे सदस्य या नात्यानेसुध्दा आपण या मध्ये उपसमितीचे बैठक घेण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे …यावेळी असंख्य शेतकरी उपस्थित होते

