बुलढाणा
प्रेमप्रकारणातून एकाची हत्या, मुख्य आरोपीसह चार जणांना अटक…
न्यायाल्यात केले हजर…
चार दिवसाची मिळाली पोलीस कस्टडी..
पोलिसांनी काही तासात केले आरोपी गजाआड ..
अँकर
प्रेम प्रकारणातून सहा जणांनी एकाची भर दिवसा हत्या केल्याची घटना बुलढाण्यात घडली, .. चिखली रोडवरील हॉटेल ग्रीनलिप च्या बाजूला एका बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी सनी सुरेश जाधव याला देवराज माळी याने बोलाविले , त्या ठिकाणी आणखी पाच जण उपस्थित होते, सनी बोलाविलेल्या ठिकाणी म्हणजे ग्रीनलिप हॉटेल जवळ आला असता त्याच्या थोडी बातचीत केली त्यानंतर देवराज माळी याने खिशातून चाकू काढून सनीच्या पोटात व छातीत खूपसले त्यात सनी जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात कोसळला तेव्हा देवराज व त्याचे सर्व साथीदार घटनास्थळावरून फरार झाले.. जखमी सनी जाधव ला सरकारी दवाखाण्यात दाखल केले असता डॉक्टरने सनी ला मृत घोषित केले…

देवराज माळी याचे एका मुलीशी प्रेम प्रकरण सुरु होते, काही दिवसा अगोदर त्यांच्यात ब्रेकअप झाले होते व नंतर त्या मुलीने सनी जाधव याच्याशी जवळीक साधली असल्यावंगी माहिती देवराज माळी ला कळले त्यावरून देवराज माळी याने सनी ला मारहान करणार असल्याची धमकी दिली होती.. त्यानुसार बुलढाणा शहरातील भिलवाडा परिसरातील देवराज माळी व त्याचे साथीदार यांनी सनी जाधव ची हत्या केली.. सनी च्या वडिलांच्या फिर्यादिवरून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करीत तपासाचे चक्रे वेगाने फिरवले व काही तासातच मुख्य आरोपीसह चार जणांना अटक केली हत्येचा गुन्हा दाखल करीत आज बुलढाणा जिल्हा सत्र न्यायाल्यासमोर हजर केले, न्यायालयाने चारही आरोपीना चार दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली असून बुलढाणा शहर पोलीस पुढील तपास करीत आहे

