अण्णाभाऊ साठे साहित्याचा ध्रुवतारा
प्रो. डॉ.गोपाल बच्छिरे
अण्णाभाऊ साठे साहित्याचा ध्रुवतारा असे वक्तव्य
प्रो. डॉ.गोपाल बच्छिरे यांनी अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्याच्या भाषणात केले.

लोणार तालुक्यातील गोत्रा येथे अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते महिपत वाणी यांनी केले होते, या कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून डॉ. बच्छिरे बोलत होते ते पुढे म्हणाले अण्णाभाऊ साठे हे समतेचे मूर्तीमंत उदाहरण असून महाराष्ट्र एकीकरणाच्या लढ्यात अण्णाभाऊ साठे यांनी स्वतःच झोकून दिले होते १९५८ मध्ये अण्णाभाऊंनी “माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होते या काहीही” या छक्कडगीताने लोकांना पेटवून उठवले व महाराष्ट्र एकीकरणासाठी मुंबईत ६० हजार लोकांचा मोर्चा काढून मुंबई ही महाराष्ट्रात सामील करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे याप्रसंगी कवी शिवाजीराव मोरे, प्रल्हाद मोरे सर, कवी डी आर बांगर, सुदन अंभोरे सर यांनीही अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकून कवितेच्या माध्यमातून अण्णाभाऊ अभिवादन केले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना उबाठाचे शहर प्रमुख गजानन जाधव सर, युवासेनेचे श्रीकांत मादनकर, तानाजी अंभोरे, ज्ञानेश्वर दूधमोगरे, लुकमानभाई कुरेशी, अशपाक खान, फईम खान, राजेभाऊ इंगोले, केशव नरवडे, राहुल नरवडे, गजानन सोनवणे सर, ज्ञानदेव शेळके सर, आदींची उपस्थिती होती व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तंटामुक्ती अध्यक्ष भिवाजी घाटे यांनी केले तर आभार महिपत वाणी यांनी मानले

