- पहिले ‘आंबेडकरी कथालेखक’ साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे-कुणाल पैठणकर
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून शेतकरी, कष्टकरी,बहुजन वंचित समाजाचा नायक आपल्या उभा केला.जो गावाकुसा बाहेर राहणाऱ्या शोषित वर्गाला स्वाभिमानाने आणि संघर्ष करण्याकरिता प्रेरित करतो. हे वैचारिक लिखाण बहुजन समाजामध्ये स्वाभिमान, शिक्षण आणि संघर्षाची बी जे रोवण्याचे काम करतात. ही प्रेरणा आंबेडकरी विचारातून जन्माला आली आहे.असे प्रतिपादन कुणाल पैठणकर यांनी केले.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रीय चर्मकार महासंघ बुलढाणा च्या वतीने दि.3 ऑगस्ट 2025 रोजी गुरु रविदास महाराज सामाजिक भवनाच्या सभागृह मुठ्ठे लेआउट बुलढाणा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.
ते बोलताना पुढे म्हणाले अण्णाभाऊ साठे हे पहिले आंबेडकरी कथा लेखक आहेत. त्यांनी कादंबरी, कथा,लोकनाट्य, शाहिरी आणि विविध लेखांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव पूर्वक उल्लेख केला आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या कथेतील नायक हा बाबासाहेबांनी केलेल्या उपदेशाला आपल्या जीवनात उतरवण्यासाठी कशा पद्धतीने संघर्ष करतो हे दिसते. सोन्याच्या मनी नावाच्या कथेत एक म्हातारी गरीब दलित स्त्री बाबासाहेबांच्या चळवळीला कशाप्रकारे मदत करते या आशयाची कथा लिहिली आहे. वळण,उपकाराची,परतफेड, सापळा सारख्या कथा वास्तववादी समाजाला दिशादर्शक ठरतात. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात 20 मार्च 1927 ला महाड येथील कुलाबा येथील बहिष्कृत परिषदेच्या बैठकीत घेतलेल्या ठरावानुसार गावातील मेलेली जनावरे ओढण्याचे काम त्या काळातील अस्पृश्य समाजाने बंद केले होते. या बाबासाहेबांनी केलेल्या विधानावरती. सापळा नावाची आंबेडकरी कथा अण्णाभाऊंनी लिहिली आहे. अशा असंख्य कथा आणि लेखातून आंबेडकरी विचारांचा प्रभाव हा अण्णाभाऊंच्या लेखणीवर दिसतो त्यामुळे अण्णाभाऊ साठे हे पहिले आंबेडकर कथाकार होता. असे विचार आपल्या अध्यक्ष भाषणातून कुणाल पैठणकर यांनी व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून माजी शिक्षणाधिकारी प्रा. आनंदराव दुतोंडे साहेब, दामोदर बिडवे, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. डी.आर.माळी, अमरावती विभागीय अध्यक्ष भगवान तांदळे सर, मुकुल पारवे, भिकाजी जोहरे, जयराम जोरेवार
यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश खनसरे यांनी केले तर आभार प्रा.बी.एन.तांदळे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भीमसेन शिराळे, बाळासाहेब वानरे, भ.सू.खरात, प्रा.आर.एस.बशिरे,अमन बाजड, भिकाजी खैरे, समाधान माळी, छगन शिराळे, रामेश्वर गव्हाळे, तुलसीदास लहाने, गिरीश सरसांडे, व इतर सभासदांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.

