8.3 C
New York
Friday, December 19, 2025

Buy now

spot_img

मयत कर्मचाऱ्याच्या कुटुंबियास ५० हजारांची मदत राजर्षी शाहू मल्टिस्टेटची सामाजिक बांधिलकी

मयत कर्मचाऱ्याच्या कुटुंबियास ५० हजारांची मदत

राजर्षी शाहू मल्टिस्टेटची सामाजिक बांधिलकी

बुलढाणा: हृदयविकाराने निधन झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबियास राजर्षी शाहू मल्टीस्टेटच्यावतीने ५० हजार रुपयांची मदत देण्यात आली.

मेहकर तालुक्यातील आरेगाव येथील गजानन नारायण वायाळ हे संस्थेच्या सिल्लोड शाखेत कार्यरत होते. काही दिवसांपूर्वी त्यांचे हृदयविकाराने निधन झाले. घरातील कर्ता व्यक्ती अचानक काळाने हिरावल्याने पत्नी, मुलगी, वृद्ध आई- वडीलांवर दुःखाचा डोंगर कोसळला. संस्थापक अध्यक्ष संदीपदादा शेळके, संस्थाध्यक्षा मालतीताई शेळके यांनी शोकाकुल कुटुंबाचे सांत्वन केले. मयत कर्मचारी यांचे वडील नारायण दौलत वायाळ, आई कांताबाई नारायण वायाळ यांना ५० हजारांची मदत दिली.

Related Articles

ताज्या बातम्या