बुलढाणा ब्रेकिंग…*
*बेकायदेशीर वागणाऱ्या 5 पोलीस कर्मचारी निलंबीत….*
*जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांची धडक कारवाई…*
निलेश तांबे जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा यांनी दि.22/05/2025 रोजी पोलीस अधीक्षक पदावर पदभार स्विकाकरुन दि.26/05/2025 रोजी घेतलेल्या पहिल्याच बैठकीत पोलीसांनी जनतेशी सुसंवाद ठेवून, जनतेप्रति सौदार्यपूर्ण व सलोख्याचे संबंध प्रस्थापित करावे, कर्तव्य पार पाडतांना प्रलोभन व आमिषाला बळी न पडता आपले कर्तव्य पार पाडावे तसेच कारवाई दरम्यान सामान्य नागरीकांना नाहक त्रास होणार नाही, याची कटाक्षाने खबरदारी घेणेबाबत आदेशीत केले होते. या आदेश व सुचनांचे उल्लंघन करणाऱ्या अंमलदारांवर कठोर कारवाई करण्यात येईल, याची सर्वांना पुर्वकल्पना दिलेली होती. असे असतांना पो.स्टे. चिखली हद्दीत काही पोलीस कर्मचारी बेकायदेशीर वागले असल्याने त्या पाच पोलीस कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करीत निलंबीत करण्यात आले आहे…
दि.06/08/2025 रोजी तक्रारदार ताज अब्दुल रहेमान रहेमतुल्लाह वय 23 वर्षे रा. गांधीनगर, चल्लेकरे, जि. चित्रदुर्गा (कर्नाटक राज्य) यांनी पो.स्टे. चिखली येथे तक्रार दिली की, दि.5 जुलै रोजी ते स्वतः तसेच सहकारी असे खाजगी वाहनाने मलकापूरकडे जात असतांना, चिखली – बुलढाणा बायपास रोड वर दोन ट्राफिक पोलीसांनी त्यांची गाडी थांबवून, कारवाई न करण्यासाठी पेटीएमव्दारे 1500/-रु. घेतले. या नंतर समोरील रोडवर ईतर 03 पोलिसांनी त्यांची गाडी थांबवून फिर्यादीजवळ असलेल्या एअर रायफलवर कारवाई न करण्यासाठी 02 लाख रु.ची मागणी केली. यावेळी फिर्यादी चिखलीकडे येतांना त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने, अपघात होऊन गाडी पलटी झाली. फिर्यादी यांच्या अशा रिपोर्टवरुन पो.स्टे. चिखली येथे अप.क्र. 610/2025 कलम 308(2), 308(3), 351(2), 3(5) भा.न्या.सं. प्रमाणे नोंद करण्यात आला आहे.
या घटनेची गंभीर दखल घेत प्रकरणाची कसून चौकशी करण्यात आली त्या आधारे जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी गुन्ह्याची गंभीरता व संवेदनशीलता लक्षात घेवून तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. सदर गुन्हा खालील अंमलदार यांनी केल्याचे निष्पन्न आहे.
1. पो.हवा/1198 गजानन भंडारी, नेमणूक- जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा-बुलढाणा
2. पोकॉ./2544 अभय टेकाळे, नेमणूक- पो.स्टे. चिखली,
3. पो.हवा./819 विठ्ठल काळुसे, तत्का. नेमणूक- महामार्ग पो. मदत केंद्र मलकापूर, सध्या पो.अ. कार्या., बुलढाणा
4. पोकॉ./1069 संदिप किरके, तत्का. नेमणूक- महामार्ग पो. मदत केंद्र मलकापूर, सध्या पो.अ. कार्या., बुलढाणा
5. पोकॉ./306 विजय आंधळे, तत्का. नेमणूक- महामार्ग पो. मदत केंद्र मलकापूर, सध्या पो.अ. कार्या.,
या पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे…
उपरोक्त पोलीस अंमलदार यांना कायद्यांची पुर्ण माहिती असतांना सुध्दा त्यांची वरील कृत्य केल्याचे दिसून येते. नमुद पोलीस अंमलदारांवर भारतीय न्याय संहितेच्या विवीध कलमांन्वये गुन्हा नोंद करुन, पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच मा. पोलीस अधीक्षक बुलढाणा यांचे दि. 7 जुलैच्या कार्यालयीन आदेशानुसार उपरोक्त 05 पोलीस अंमलदार यांना कर्तव्यात कसुरी केल्याचे कारणावरुन निलंबीत करण्यात आले असून निलंबन काळात त्यांचे मुख्यालय हे पोलीस मुख्यालय बुलढाणा ठेवण्यात आले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन चिखली यांचे कडून करण्यात येत आहे…..

