बुलढाणा…
- *महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीच्या निमित्ताने वामनदादांच्या गीतांच्या मैफिलीचे आयोजन..*
महाकवी वामनदादा कर्डक यांच्या 103 व्या जयंतीच्या निमित्ताने लोकराजा शाहू फाउंडेशन व दि बुद्धिस्ट ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट बुलढाणा च्या वतीने रविवार दि. 24 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता गोवर्धन सभागृह बुलढाणा अर्बन मुख्य शाखे समोर, कारंजा चौक बुलढाणा येथे वामनदादांच्या गीतांच्या मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. महाकवी वामनदादा कर्डक यांचा बुलढाणा शहर व परिसरात प्रदीर्घ सहवास लाभला आहे. बरीच गीते वामनदादांनी बुलढाणा नगरीतच रचली जी आज जगप्रसिद्ध झाली आहेत. वामनदादाप्रति कृतज्ञता व्यक्त
करण्यासाठी गेल्या नऊ वर्षापासून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. वामनदादांनी लिहिलेली सिने गीते लोकगीते शेतकरी गीते देशभक्तीपर गीते व बुद्ध, शिव, फुले, शाहू, आंबेडकरांच्या गीतांची मैफिल ही प्रसिद्ध गायक अजय देहाडे, अमोल विजयानंद जाधव, सपना खरात व चेतन चोपडे यांच्या स्वरांनी रंगणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. अप्पर जिल्हाधिकारी रमेश घेवंदे हे करणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लोकराजा शाहू फाउंडेशनचे अध्यक्ष दादासाहेब काटकर हे राहणार आहेत. तर प्रमुख उपस्थिती म्हणून शाहीर डी. आर. इंगळे, दामोदर बिडवे, डॉ. राजेश्वर उबरहंडे, वच्छलाबाई जनार्दन गवई, मंगल गोपीनाथ मिसाळ, प्रा.डॉ. की.वा.वाघ, पत्रकार कृष्णा सपकाळ, पत्रकार ब्रह्मानंद जाधव यांची उपस्थिती लाभणार आहे. तरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमाचे मुख्य निमंत्रक कुणाल पैठणकर, प्रा. डी. आर. माळी, प्रा. राजेश खंडेराव एड. राहुल दाभाडे, सुरेश डवरे, राजेश टारपे, गणेश झोटे, मोनिका साळवे, सारिका घेवंदे, सुरेश सरकटे, भिकाजी मेढे, संजय जाधव, प्रा. प्रदीप जाधव, सुरेश घेवंदे, प्रशांत बोर्डे, पंजाबराव निकाळजे, संजय खांडवे, पद्माकर डोंगरे, प्रल्हाद कांबळे, सिद्धार्थ आराख, विनोद फकीरा इंगळे व लोकराजा शाहू फाउंडेशन, दि बुद्धिस्ट ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्टच्या सर्व सदस्यांनी केले आहे.

