बुलढाणा
सतत ४ दिवसापासून सिंदखेड राजा तालुक्यातील पाचही महसूल मंडळ आणि देऊळगाव राजा तालुक्यातील महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी पाऊस सुरू
आता तरी सरकारने शेतकऱ्याचे चीत पाहू नका सरसकटपणे सर्वे करा आणि शेतकऱ्याला प्रति हेक्टर पन्नास हजार रुपये मदत द्या…… शेतकरी नेते बालाजी सोसे
आज पळसखेड चक्का तालुका सिंदखेड राजा देऊळगाव राजा तालुक्यातील सर्वच महसूल मंडळामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जिकडे तिकडे पाणीच पाणी ६ ऑगस्ट पासून सतत पाऊस असल्याने रात्री
अचानक अतिवृष्टी होऊन अचानक पातळगंगा नदीला व वड्याला पाणी आल्यामुळे आज दिनांक ९ ऑगस्ट रोजी सकाळी शेतकरी शेतामध्ये गेले असता कपाशी व सोयाबीन पूर्णपणे पाण्याखाली गेली सोयाबीन फूल अवस्थेत असल्यामुळे सतत तीन दिवसाच्या पावसाने सोयाबीन पिकाचे १००% नुकसान होणार. आता शेतकऱ्यांनी सोयाबीन पीक हातातून जाणार आणि कपाशी सुद्धा पाण्याखाली असल्याने शेतकऱ्यांनी आता सरकारकडेच मदतीची हाक मारीत आहे. सरकार मायबाप शेतीचा सर्वे करा आणि शेतकऱ्याला मदत द्या आता तरी शेतकऱ्याला कर्जमाफी द्या शेतकऱ्याकडे आता पर्याय उरले नाही होत्याचं नव्हतं झालं. हातातलं सर्वच पीक गेले मग शेतकऱ्यांनी जगायचं कसं, असा प्रश्न श्री बालाजी सोसे यांनी सरकारला विचारला शेतकऱ्याला भरीउ मदत द्या अशी मागणी आता शेतकरी योद्धा कृती समिती करीत आहे.

