3.6 C
New York
Thursday, December 18, 2025

Buy now

spot_img

10 सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ मदत द्या…… नाहीतर सिंदखेडराजा तालुक्यातील शेवटच्या गावापासून उपविभागीय कार्यालयापर्यंत लॉंग मार्च काढण्यात येईल….

10 सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ मदत द्या…… नाहीतर सिंदखेडराजा तालुक्यातील शेवटच्या गावापासून उपविभागीय कार्यालयापर्यंत लॉंग मार्च काढण्यात येईल….. असा इशारा शेतकरी योद्धा कृती समितीच्या वतीने देण्यात आला

गेल्या अनेक दिवसापासून
सिंदखेड राजा , देऊळगाव राजा, लोणार तालुक्यामध्ये दिनांक ६ ऑगस्ट पासून सतत पाऊस चालू असून आपल्या सिंदखेड राजा तालुक्यातील पर्जन्यमापक यंत्रणेचे आकडे पुढे सरकायला तयार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे इथून पुढे नुकसान नाही म्हणून ओला दुष्काळ जाहीर करा या मागणी करिता आज शेतकरी योद्धा कृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे .ओला दुष्काळ जाहीर करण्याचे दोन्ही निकष आपल्याकडे असून आणि त्या दोन्ही निकषांमध्ये हे तिन्ही तालुके बसत आहे. विशेष म्हणजे 65 मिली पेक्षा जास्त पाऊस पडला तर अतिवृष्टी म्हणून ते तालुका व मंडळ जाहीर होतं पण आपल्या तिन्ही तालुक्यांमध्ये सतत १३ दिवस पाऊस असून तिन्ही तालुके ओला दुष्काळामध्ये अतिवृष्टीच्या निकषांमध्ये बसत आहे
सध्याच्या पावसाचा अंदाज घेऊन हे तिन्ही तालुके ओला दुष्काळ जाहीर करा आपल्या तालुक्यामधील काही शेतकऱ्यांच्या अति पावसामुळे विहिरी ढासळल्या काही ढसाळण्याच्या शक्यता आणि काही विहिरी पूर्णपणे फुटलेल्या आहे पाण्याचा दाब जमिनीत जास्त झाल्यामुळे त्यांचा सर्वे करून त्यांची विहिरीची दुरुस्ती करण्यात यावी व मदत देण्यात यावी
प्रमुख मागण्या ,
(१) सिंदखेड राजा देऊळगाव राजा लोणार या तालुक्यांमध्ये ओला दुष्काळ जाहीर करा
(२) शेतकऱ्यांच्या विहिरी ढासळल्या असून तात्काळ सर्वे करून त्यांना मदत देण्यात यावी पळसखेड चक्का येथील महिला शेतकरी श्रीमती हाऊबाई संतोबा सोसे गट नंबर 232 , प्रमोद रामेश्वर नागरे , विष्णू भीमराव सोसे .पाटील परभाता मुंडे, देविदास कारभारी मुंडे व इतर शेतकरी. सावखेड तेजन, आलापुर , सिंदखेड राजा या ठिकाणच्या सुद्धा शेतकऱ्यांच्या विहिरी घसाळ्या आहे
(३) प्रति हेक्टर शेतकऱ्यांना 50 हजार रुपये मदत द्या.
(४) सध्या ईपिकपेऱ्याची वेबसाईट बंद अवस्थेमध्ये आहे या तिन्ही तालुक्यांमधील शेतकऱ्यांची ईपिकपेऱ्याची नोंद ऑफलाइन तलाठी साहेबांनी करावी.
(५) मागील २३/२४ चा ज्या शेतकऱ्यांचा पिक विमा बाकी आहे त्यांना तात्काळ द्या .

(६) सध्याची पावसाची अवस्था पाहून शेतकऱ्याची शंभर टक्के नुकसान झाली या शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी द्या. आणि पुन्हा कर्ज द्या तरच शेतकरी जगेल नाहीतर शेतकऱ्याची सध्याची बिकट अवस्था आहे.
वरील मागण्या या शेतकरी हिताच्या असून आपण या मागण्याकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन आमच्या मागण्या पूर्ण करा जर आमच्या मागण्या दिनांक.१०/०९/२०२५ पर्यंत पूर्ण न झाल्यास सिंदखेडराजाच्या शेवटच्या टोकाच्या गावापासून लॉंग मोर्चा उपविभागीय कार्यालयावर काढण्यात येईल याची सर्व जबाबदारी ही प्रशासनाची राहील असा इशारा शेतकरी योद्धा कृती समितीने दिला आहे यावेळी निवेदन देण्यासाठी उपस्थित शेतकरी नेते शेतकरी योद्धा कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री बालाजी सोसे. शेतकरी मित्र दिलीप भाऊ चौधरी. शेतकरी नेते आयाज पठाण. राजूभाऊ आढाव सिंदखेड राजा. शेतकरी नेते प्रदीप मेहेत्रे. आधी शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते

Related Articles

ताज्या बातम्या