-3.9 C
New York
Tuesday, December 16, 2025

Buy now

spot_img

जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांचे हस्ते मोबाईल फॉरेन्सीक व्हॅनचे उद्घाटन..

बुलढाणा

*जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांचे हस्ते मोबाईल फॉरेन्सीक व्हॅनचे उद्घाटन...

 

निलेश तांबे, पोलीस अधीक्षक-बुलढाणा यांचे हस्ते बुलढाणा जिल्ह्याला नव्याने प्राप्त झालेल्या मोबाईल फॉरेन्सीक व्हॅनचे उद्घाटन करण्यात आले. हा उद्घाटन कार्यक्रम हा पोलीस अधीक्षक कार्यालयाचे प्रांगणामध्ये पार पडला. शासनाकडून जिल्हा पोलीस दलास नव्याने प्राप्त झालेल्या मोबाईल फॉरेन्सीक व्हॅनमुळे गुन्ह्यांचे घटनास्थळाला वेळीच भेटी देऊन शास्त्रोक्त व वैज्ञानिक पध्दतीने पुरावे गोळा करण्यात येणार आहे. या मोबाईल फॉरेन्सीक व्हॅनवर 08 कर्मचारी कर्तव्यावर राहणार असून ते 24 तास कार्यरत राहणार आहेत. फॉरेन्सीक व्हॅनमुळे दाखल गंभीर, दखलपात्र, क्लीष्ट आणि संवेदनशील गुन्ह्यातील पुरावे हस्तगत करण्यास मदत होऊन, त्याचा तपास व न्याया प्रक्रियेत मदत होऊन त्यातून दोषसिध्दीत निश्चीत वाढ होणार आहे.

 

या प्रसंगी निलेश तांबे पोलीस अधीक्षक बुलढाणा, सुधीर पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी बुलढाणा, पोलीस निरीक्षक सुनील अंबूलकर स्थानिक गुन्हे शाखा-बुलढाणा, बाळकृष्ण पावरा प्रभारी पोउपअधि. (मुख्या.) बुलढाणा, पोनि. रवि राठोड पो.स्टे. बुलढाणा शहर, पोनि. गजानन कांबळे पो.स्टे. बुलढाणा ग्रामीण, विकास तिडके राखीव पोलीस निरीक्षक पोमु, बुलढाणा, सपोनि, दिपक ढोमणे वाचक-पोअ.बुलढाणा, पोउपनि. प्रताप बाजड स्थागुशा., पोउपनि. निजाम तांबोळी नि. क. बुलढाणा तसेच मोबाईल फॉरेन्सीक व्हॅनचे कर्मचारी, पोलीस अधिकारी व अंमलदार आणि कार्यालयीन स्टाफ बहू संख्यने उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या