3.6 C
New York
Thursday, December 18, 2025

Buy now

spot_img

लोणार मधील महावितरण कंपनीचा गलथान कारभार… 11 केव्ही ची तार तुटली व लागली आग.. , सुदैवाने हानी नाही…

लोणार मधील महावितरण कंपनीचा गलथान कारभार…

11 केव्ही ची तार तुटली व लागली आग.. , सुदैवाने हानी नाही…


लोणार प्रतिनिधी
लोणार पोलीस स्टेशन समोर काटे नगर येथे आज सकाळी सात वाजता 11 kv चे प्रवाहाचे तार तुटून जमिनीवर आग लागली अशी माहिती कळताच शिवसेना उबाठाचे जिल्हा संघटक डॉ गोपाल बछिरे, शहर प्रमुख गजानन जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली महावितरण कंपनीच्या अभियंतांना घटनास्थळी बोलावले व त्यांना विचारणा केली.
लोणार शहरासाठी महावितरण कंपनीने मुख्य वीज वाहिनी 11 केव्ही प्रवाहामध्ये एलटी लाईन साठी वापरला जाणारा दहा एमएम चा तार का वापरण्यात आला आहे?, वीज प्रवाहाचे लटकलेली तार झाडांना दोरीने का बांधण्यात आलेली आहे? 11KV च्या तारेच्यावरून वडाच्या झाडाच्या फांद्या जशाच्या तशा आहेत याची देखभाल कोणी करावी? असे प्रश्न विचारले असता महावितरण चे अभियंता यांना कोणतेही उत्तर देता आले नाही. लोणार पोलीस स्टेशन समोरील काटे नगर येथे यापूर्वीही हीच विजेची तार तुटून दोन घटना घडल्या आणि दोन माणसांना आपले जीव गमवावे लागले आहे
असे असून देखील महावितरण कंपनी कुंभकर्णाच्या झोपेत आहे तिला जाग येत नाही आज काटे नगर मध्ये पुन्हा अशीच घटना घडली 11 केव्ही चा प्रवाह मधला एक तार तुटून श्री श्रीकांत तेजराव मादनकर यांच्या आईच्या अंगावर पडली व जमिनीवर आग लागली त्याचबरोबर तेथे लहान मुलं खेळत होती नशिबाने येथे कोणतीही जीवित हानी झाली नाही व दुर्घटना टळली अन्यथा या महावितरण कंपनीने आज पुन्हा काही बळी घेतले असते महावितरण कंपनी ही स्वायत्त आहे ती शासनाची नाही तेथील कर्मचारी हे खाजगी आहेत ते शासकीय कर्मचारी नाहीत परंतु जेव्हा या कंपनीवर काही आक्षेप येतो तेव्हाही कंपनी आम्ही शासकीय आहोत असे भासवण्याचे प्रयत्न करते आणि पोलीस प्रशासन त्यांना कुठल्याही प्रकारचा अभ्यास न करता समर्थन देतात हे चूक आहे
या अकरा केवीच्या दहा एम एम च्या तारेवर लोणार शहराचे 70 टक्के वीज जोडण्या आहेत लोणारचा पाणीपुरवठा सरकारी दवाखाना पोलीस स्टेशन व दहा ते बारा वार्ड या प्रवाहावर आहे आणि सदरील वीज प्रवाह हा रहिवासी कॉलनी मधून घरांच्या वरून गेलेला आहे शिवसेना उबाठाचे जिल्हा संघटक डॉ गोपाल बछिरे, शहर प्रमुख गजानन जाधव यांनी महावितरण कंपनीला दोन वेळा सदरील वीज प्रवाह याचा मार्ग बदलून रहिवासी कॉलनी मधून हा विज प्रवाह काढून रस्त्याच्या कडेने जोडण्यात यावा त्यासाठी निवेदन दिले आहेत परंतु अद्यापही त्यावर कार्यवाही झाली नाही म्हणून आज महावितरण ला इशारा दिला की यानंतर पुढील तीन दिवसात सदरील हाई पावर इलेव्हन केवी वीज प्रवाह या रहिवाशी कॉलनी मधून काढून मुख्य रस्त्याच्या बाजूने जर घेतली नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा महावितरण कंपनीच्या अभियंत्यास दिला यावेळी माजी मंत्री सुबोध ची सावली यांचे सुपुत्र शैलेश सावजी यांनी सुद्धा मुख्य अभियंता यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून सदरील समस्या दूर करण्याची विनंती केली याप्रसंगी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष भूषण मापारी माजी नगरसेवक शिंदे उपस्थित होते

Related Articles

ताज्या बातम्या