*शेलोडी ता.चिखली येथील शिक्षक दिन : एक परंपरागत लोकोत्सव*….
“_गुरुरं ब्रह्मा गुरुरं विष्णू गुरुरं देवो महेश्वरा , गुरुरं साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः_”….

प्रत्येक मनुष्य जन्माला आल्यानंतर आई त्याची पहिली गुरू असते , बोट धरून चालायला शिकविणारे वडील त्याचे दुसरे गुरू असतात तर शालेय शिक्षणाबरोबर औपचारिक व अनौपचारिक शिक्षण देणारे विश्वातील संपूर्ण ज्ञानाच्या प्रकाशाने जीवन समृद्ध करणारे शिक्षण देणारे गुरू म्हणजेच शिक्षक हे प्रत्येक मनुष्याचे तिसरे गुरू असतात.

अश्याच गुरूंच्या ऋणातून आपण मुक्त तर होऊ शकत नाही परंतू त्याच गुरूंचा आदर्श सत्कार सोहळा आयोजित करून उतराई होता येईल का ? या भावनेने आज दि. 5 सप्टेंबर 2025 रोजी भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीदिनी *जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा शेलोडी ता. चिखली* येथे आगळा वेगळा सोहळा पार पडला.
सर्वप्रथम शाळा व्यवस्थापन समिती, सर्व पालक ,गावातील सर्व प्रतिष्ठित व्यक्तींनी ढोल ताश्यांच्या गजरात शिक्षकांची भव्य दिव्य मिरवणूक काढून शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर सर्व शिक्षकांचा शाल- श्रीफळ पुष्पहार घालून यथोचित सन्मान करून शिक्षकांच्या अंगावर विद्यार्थी व पालकांनी पुष्पवृष्टी करून सर्व शिक्षकांना सन्मानपूर्वक मंचकावर स्थानापन्न केले .
एकीकडे सरकारी शाळा ओस पडत असताना चिखली तालुक्यातील जि.प.म.उ.प्रा. शाळा शेलोडी ही सन 2009 पासून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव अग्रेसर असणारी,नाविन्यपूर्ण उपक्रमशील शाळा ठरलेली आहे .शाळेचे मागील 4 वर्षात स्पर्धा परीक्षेतून 31 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत झळकले आहेत तर 5 विद्यार्थी शासकीय विद्यानिकेतन अमरावती येथे प्रवेशित आहेत, तसेच सन 2022 मध्ये 4 विद्यार्थी व 2025 मध्ये 3 विद्यार्थी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करून प्रवेशित आहेत, 2023 मध्ये 4 विद्यार्थ्यांनी NMMS परीक्षेत राज्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवून प्रत्येकी 9600 ₹ सारथी शिष्यवृत्ती मिळवली आहे.
*याप्रसंगी शेलसुर केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय श्री अनाळकर साहेब , उपक्रमशील आदर्श शाळेचे मुख्याध्यापक श्री बंडू अंभोरे सर , श्री संजय शेळके, श्री प्रदिप रिंढे, श्री शिवाजी देशमुख, श्री ज्ञानेश्वर सावळे, श्री समाधान जाधव, श्री अमरदिप जयशेट्टे असे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारे शिक्षक लाभले असल्याच्या भावना शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री कैलास घाडगे , उपाध्यक्ष, सर्व सदस्य, आणि पालक तसेच समस्त गावकऱ्यांनी प्रमुख पाहुण्यांकडे व्यक्त केल्या*.

कार्यक्रमासाठी या शाळेने घडवलेले माजी विद्यार्थी देशसेवेत कार्य केलेले वाघमारे सर , शिक्षक , इंजिनीयर, कृषी सहाय्यक, आरोग्य सेविका ,ग्रामपंचायत सरपंच , उपसरपंच तथा सर्व सदस्य, माजी सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष , सोसायटी चेअरमन व सदस्य तसेच संपुर्ण पालक, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते .
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन शाळेचे माजी विद्यार्थी श्री शेषराव घेवंदे यांनी तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक अंभोरे सर यांनी केले.

