-6.1 C
New York
Monday, December 15, 2025

Buy now

spot_img

आमदार संजय कुटे ह्यांच्या घरगुती गणेशाचे कुत्रिम तलावात विसर्जन…

आमदार संजय कुटे ह्यांच्या घरगुती गणेशाचे कुत्रिम तलावात विसर्जन…


जळगाव जामोद नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुरज जाधव यांनी गणपती विसर्जना निमित्ताने शहरातील नागरिकांसाठी विविध सोई सुविधा उपलब्ध केल्या आहेत…. यानिमित्ताने शहरात प्रथमच विसर्जन मिरवणूक मार्गावर नागरिकांच्या सोयीसाठी पिण्याचे पाणी, प्रथमोपचार पेटी तसेच मिरवणूक मार्गाचा नकाशा नगरपरिषद जळगाव जामोद यांच्यावतीने उपलब्ध करण्यात आला आहे… तर मिरवणूक मार्गावर नगरपालिका कर्मचारी उपस्थित राहून गणेश भक्तांना या सुविधा पुरणार आहेत…. नगरपालिकेच्या वतीने जळगाव जामोद शहरात गणेश विसर्जना निमित्त्ताने मदत कक्ष तयार केले असून हे मदत कक्ष शहरातील जुना भाजी बाजार, चावडी जवळ एचडीएफसी बँके शेजारी, दुर्गा चौक,येथे स्थापन करण्यात आले असून यामुळे नागरिकांची गैरसोय टळणार असल्याची माहिती नगरपालिके कडून देण्यात आली आहे….

तसेच नगरपरिषद जळगाव जामोद कार्यालयाच्या समोरील मोकळ्या जागेत घरगुती श्री. गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव व निर्माल्य कलशाची देखील सोय करण्यात आलेली आहे….
जळगाव जामोद नगरपालिके कडून गणपती विसर्जना निमित्त्ताने पहिल्यांदाच अशा सुविधा निर्माण करण्यात आल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होताना दिसत आहे… तर शहरातील नागरिकांनी गणपती विसर्जना निमित्ताने नगर पालिका प्रशासना कडून पुरविण्यात येणाऱ्या सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन नगरपरिषद मुख्याधिकारी सुरज जाधव यांनी केले आहे…
जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय कुटे यांच्या घरगुती गणेशाचे नगरपालिका कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले .. यावेळेस आमदार संजय कुटे आणि मुख्याधिकारी सुरज जाधव सपत्नी उपस्थित होते.

 

Related Articles

ताज्या बातम्या