बुलढाणा फ्लॅश
*वंचित आणि भारतीय बौद्ध महासभेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा…*
*1949 चा कायदा रद्द करून महाबोधी बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी…*

अँकर
समस्त बुद्ध धर्माचे श्रद्धास्थान असलेल्या बिहार येथील महाबोधी बुद्ध विहार, बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्यात यावे त्याचबरोबर बुद्ध विहारसंदर्भात 1949 सालचा कायदा रद्द करण्यात यावा, यासाठी संपूर्ण देशभरात पुन्हा एकदा आंदोलन उभारले आहे.. भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने संपूर्ण राज्यभर ठीक ठिकाणी आंदोलन करण्यात आले, त्याच पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर देखील भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला.. वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभेच्या संयुक्त विद्यमाने हा मोर्चा काढण्यात आला.. ज्यामध्ये जिल्हाभरातील बौद्ध समाज बांधव, भगिनी, समता सैनिक दल मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.. आपल्या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यां मार्फत महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन पाठवण्यात आले आहे…

