पुणे
*रूपक नृत्यालयाचा संघ मॉस्कोला रवाना…*
*रशिया मध्ये जाऊन पुणे येथील नृत्य संघ भारताच प्रतिनिधित्व करणार …*
पुणे येथील कथ्थक नृत्यांगना मंजिरी कारुळकर, त्यांच्या रूपक नृत्यालयातील १० विद्यार्थिनींचा संघ घेऊन मॉस्को येथील १९ ते २८ सप्टेंबर २०२५ रोजी होणाऱ्या आठव्या ब्रिक्स देशांच्या दहा दिवसीय नाट्य महोत्सवांमध्ये कथ्थक नृत्य शैलीतील नृत्यनाट्य सादर करण्यासाठी मॉस्कोला रवाना झाल्या. प्राची पुजारी, ऋचा कुलकर्णी, अनुष्का जाधव, प्रशांत राऊल, मृगजा ओगले, साईशा गद्रे, सानिका जोशी, युक्ता रानडे, मृण्मयी बर्वे यांचा संघात समावेश आहे. गतवर्षी जून २०२४ मध्ये झालेल्या अशाच नाट्यमहोत्सवामध्ये केलेली कामगिरी लक्षात घेऊन त्यावेळेस भारतीय संघाला सर्वोत्तम संघ जाहीर करण्यात आले होते. त्यातूनच यंदा त्यांना पुन्हा आमंत्रित करण्यात आले. यावेळी संघाच्या वतीने ‘कृष्णाख्यान’ हे नृत्यनाट्य सादर होईल…. या नृत्य संघाला भारत सरकारणे शुभेच्छा दिल्या आहेत…

