*बुलढाण्यात भोई समाजाची बैठक संपन्न….आता NTB चे स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी….
भोई समाज आरक्षण समीती ची मीटिंग संदर्भात वारकरी भवन बुलढाणा येथे आरक्षण मुद्यावर बैठक संपन्न झाली.. या बैठकीला बुलढाणा जिल्ह्यातील सर्व भोई समाज बांधव उपस्थितीत होते. भोई समाज हा NT B प्रवर्गात असुन 2.5% आरक्षण असून NT B मध्ये 38 जाती आहेत सदर मीटिंगमध्ये आरक्षण संदर्भात एनटीबी चे आरक्षण हे भोई समाजाला स्वतंत्र देण्यात यावे व तसेच भोई समाजाला आर्थिक विकास महामंडळ स्वतंत्र देण्यात यावे .तसेच भोई समाजाला राजकीय आरक्षण देण्यात यावे अशा विविध विषयावर त भोई समाज आरक्षण समितीमध्ये चर्चा करण्यात आली व लवकरात लवकर भोई समाजाच्या हजारोंच्या संख्येने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर भोई समाज आरक्षण समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार असल्याचे ठरविण्यात आले..—-भोई समाज आरक्षण समितीमध्ये संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचे सर्व भोई समाज बंधू आणि भगिनी उपस्थितीत होत्या*

