बुलढाणा ब्रेकिंग
बुलढाण्यात रिपाई आठवले गटात तुफान हाणामारी…
अध्यक्षपदाच्या निवडीवरून निरीक्षकासमोरच राडा…

होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या तयारीला सर्वच पक्ष सरसावले आहेत, त्याचं पार्षवभूमीवर बुलढाणा जिल्ह्या रिपाई अध्यक्ष पदाची निवड करण्याच्या दृष्टीने राज्यस्तरीय पक्षाचे निरीक्षक बुलढाण्यात आले होते , बुलढाणा येथील विश्राम गृह येथे जिल्ह्याच्याच्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती त्यानुसार जिल्ह्याभरातून असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते, जिल्ह्यातून सात ते आठ जण अध्यक्ष पदासाठी इच्छूक होते त्यानुसार प्रत्येकाशी निरीक्षक चर्चा करीत असताना काहीमध्ये निरीक्षकासमोरच बाचबाची झाली.. त्याचे रूपांतर तुफान हाणामारी मध्ये झाले रिपाई पक्षाची बेशिस्त पाहायला मिळाली.. निरीक्षकाासमोरच रिपाई कार्यकर्त्याची हाणामारी झाल्याने जिल्ह्यात सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे….

