-3.9 C
New York
Tuesday, December 16, 2025

Buy now

spot_img

जिल्हा नियोजन समितीची बैठक २६ सप्टेंबर रोजी होणार*

*जिल्हा नियोजन समितीची बैठक २६ सप्टेंबर रोजी होणार*

परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यामुळे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद जाधव (पाटील) यांच्या अध्यक्षतेखाली २५ सप्टेंबर रोजी होणारी जिल्हा नियोजन समितीची बैठक शुक्रवार, दि. २६ सप्टेंबर रोजी होणार आहे. ही बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीमध्ये दि. १६ मे २०२५ रोजी संपन्न झालेल्या जिल्हा नियोजन समिती बैठकीच्या इतिवृत्तावरील अनुपालन वाचून अंतिम अहवाल करणे व सन २०२५-२६ जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी घटक कार्यक्रमाच्या अनुषंगाने दि. १७ सप्टेंबर अखरेचा मासिक प्रगती अहवालाचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच आयत्यावेळी येणाऱ्या विषयाबाबत कार्यवाही केली जाणार आहे. या बैठकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुखांनी आवश्यक माहितीसह स्वत: उपस्थित राहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांनी पत्रकाद्वारे दिले आहेत.
00000

Related Articles

ताज्या बातम्या