💥 *दै. बातमीजगत ब्रेकिंग* 💥
40 लाखांच्या अपहार प्रकरणी बँक मॅनेजरला अटक…..मेहेकर व कारंजा पोलिसांची संयुक्त कारवाई…..दे.माळी इथून घेतले ताब्यात.
कारंजा, जिल्हा वाशिम येथील एका बँकेच्या मॅनेजरला 40 लाख रुपयांच्या अपहार प्रकरणी मेहकर पोलिसांनी आज देऊळगाव माळी येथून ताब्यात घेतले आहे. हितेश देवीलाल व्यास असे या बँक मॅनेजरचे नाव असून, त्याच्याविरुद्ध कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कारंजा येथील बँकेत 40 लाख रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप हितेश व्यास याच्यावर आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. आज, 24 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता तो देऊळगाव माळी येथील एका भाड्याच्या घरात लपून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्या माहितीनुसार, कारंजा आणि मेहकर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत त्याला अटक केली. ही कारवाई मेहकर पोलीस स्टेशनचे ठाणेदार व्यंकटेश आलेवार यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय संदिप बिरांजे हेड कॉन्स्टेबल नारायण मांन्टे व दोन महिला पोलीस कर्मचारी यांनी केली.
पुढील तपास कारंजा पोलीस स्टेशन शहर) चे ठाणेदार

