-3.9 C
New York
Tuesday, December 16, 2025

Buy now

spot_img

जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर* ∆ सिंदखेड राजा तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांची केली पाहणी

बुलढाणा

*जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर*…..

∆ सिंदखेड राजा तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांची केली पाहणी…

सिंदखेड राजा तालुक्यातील पळसखेड चक्का, रूम्हणा आणि वर्दडी या अतिवृष्टीग्रस्त भागाची जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी आज पाहणी केली. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांची समस्या जाणून घेतली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने आवश्यक ती मदत मिळेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान तात्काळ पंचनामे करून प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी दिले.

या पाहणीदरम्यान उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, तहसिलदार तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000

Related Articles

ताज्या बातम्या