*मेहकरात वेगळा विदर्भासाठी नागपूर कराराची होळी.*…
- मेहकर येथील जिजाऊ चौकात विदर्भ आंदोलन समीतीचे वतीने केली कराराची होळी…
विदर्भाला महाराष्टात सामील करतांना 28 सष्टेबर 1956 रोजी नागपूर करार करण्यात आला होता.त्या कराराची कोणती ही अंमल बजावणी महाराष्ट सरकारने केली नाही त्यामूळे विदर्भाच्या सर्वच क्षेञातला अनूशेष वाढत गेला.
त्यामूळे वेगळ्या विदर्भाची मागणी जोर धरत गेली.त्यामूळेनागपूर कराराची होळी करण्याचा इशारा विदर्भ आंदोलन समीतीने दिला त्यानूसार आज दिनांक 28 सप्टेबर 2025 रोजी मेहकर येथील जिजाऊ चौकात विदर्भ आंदोलन समीतीचे विदर्भ ऊपाध्यक्ष मा अॅड सुरेश वानखेडे यांच्या नेतृत्वात नागपूर कराराची होळी करण्यात आली. यावेळी विदर्भ आंदोलन समीतीचे सोपाणदादा देबाजे,भाई कैलास सुखधाने, राधेशामजी भराडे, दादासाहेब गवई, प्रा डि एस वाघ, बी बी चौधरी,प्रा विश्वनाथ बाहेकर, प्रल्हादराव रहाटे, अॅड विनोद नरवाडे, संदिपभाऊ गवई, रमेशराव गवई, पंडीतराव देशमूख,आश्रु मानवतकर आदि असंख्य कार्यकर्ते ,पदाधिकारी ऊपस्थित होते.या वेळी वेगळा विदर्भ झालाच पाहिजे, अशा गगणभेदी घोषनांनी परिसर दनाणून सोडला. व नागपूर कराराची होळी करण्यात आली.

