-3.9 C
New York
Tuesday, December 16, 2025

Buy now

spot_img

*सेवा पंधरवडा : जळगाव जामोद तालुक्यातील महाराजस्व समाधान शिबिरात नागरिकांना लाभांचे वितरण* *आमदार डॉ संजय कुटे, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांची उपस्थिती*

*सेवा पंधरवडा : जळगाव जामोद तालुक्यातील महाराजस्व समाधान शिबिरात नागरिकांना लाभांचे वितरण*

*आमदार डॉ संजय कुटे, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांची उपस्थिती*

जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राबविण्यात येत असलेल्या सेवा पंधरवडा अंतर्गत जळगाव जामोद तालुक्यातील धरती आबा योजनेत समाविष्ट असलेल्या चालठाणा व पिंपळगाव काळे या गावात महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला आमदार डॉ.संजय कुटे व जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिबिराच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांच्या हस्ते वृक्षदिंडीचे पूजन करून प्रभातफेरी काढण्यात आली. त्यानंतर परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

शिबिरात नागरिकांना विविध योजनांचे लाभ वाटप करण्यात आले. यामध्ये ॲग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी, ई-रेशन कार्ड, कागदपत्रांचा बटवा, विविध प्रमाणपत्रे, रोजगार हमी योजनेअंतर्गत जॉब कार्ड तसेच ट्रॅक्टर वाटप आदींचा समावेश होता.

शिबिरादरम्यान जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधून शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. तसेच सेवा पंधरवडा अंतर्गत सुरू असलेल्या उपक्रमांचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपविभागीय अधिकारी शैलेश काळे तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
000

Related Articles

ताज्या बातम्या