बुलढाणा
*आमदार संजय गायकवाड यांनी स्वतः चे दोन प्लॉट विकून केली अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना 25 लाख रुपयाची मदत….*
गेल्या महिन्याभरापासून राज्यात अतिवृष्टी होत आहे .. कधी नव्हे यावर्षी असा पाऊस पडत आहे तपावसाने राज्यात थैमान घातला आहे.. य पावसाने शेती खरडून गेल्या आहेत अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत .. शेतकरी पूर्णतः उध्वस्त झाला आहे अश्या परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची आवश्यकता आहे .. याचे दुःख राज्यातील एकमेव आमदार संजय गायकवाड यांनी व्यक्त केलेले दिसते आहे.. राज्य सरकारणे आवाहन मदत करण्याचे आवाहन करताच आ संजय गायकवाड हे पुढे सरसावले व त्यांनी स्वतःची वडिलोपार्जित संपत्ती मधील दोन प्लॉट विकून 25 लाख रुपयाची आर्थिक मदत केली आहे.. 25 लाख रुपयाचा धनादेश तयार करून शिवसेना मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांच्या कडे सुफूर्त करणार आहे… अशी माहिती आ संजय गायकवाड यांनी पत्रकार परिषद मध्ये दिली..
वास्तविक पाहता एवढ्या शेतकऱ्यांच्या संकटाच्या काळात सर्वांनी पुढे येऊन मदत करायला पाहिजे मात्र राजकीय दृष्ट्या एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यातच गुंतलेले आहेत…
अश्यातच बुलढाणा विधानसभा मतदार संघाचे आ संजय गायकवाड पुढे येऊन स्वतःचे दोन प्लॉट विकले व तातडीने आर्थिक मदत करायला पुढे सरसावले…

