- मानवी संवेदनांचा स्पर्श… खैरखेड येथे स्व. गजानन घोती यांच्या कुटुंबास मदतीचा हात..!
- आ संजय गायकवाड यांनी केली सढळ हाताने मदत…*
खैरखेड (ता. बुलढाणा) येथील स्वर्गीय गजानन ब्रिजलाल घोती यांचे दिनांक १६ जानेवारी २०२५ रोजी ब्लड कॅन्सरने दुःखद निधन झाले होते. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची… भूमिहीन कुटुंब असल्याने सणासुदीच्या काळातही या कुटुंबावर संकटाचे आणि उपासमारीचे सावट होते.

ही माहिती माझ्या कानावर पोहोचताच मी कोणताही विलंब न लावता आपली सामाजिक जबाबदारी व मानवी कर्तव्यभावना ओळखून तत्काळ पुढाकार घेतला. एका गरजू कुटुंबाचा दसरा गोड व्हावा, त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची झळाळी उमटावी, यासाठी मी स्वतःहून पुढे येऊन सहा महिने पुरेल इतकी जीवनावश्यक वस्तूंची किट तसेच आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला.
या किटमध्ये गहू, तांदूळ, तूरडाळ, तेल, मिरची पावडर, साबण, साखर, मीठ यांसह घरातील सर्व दैनंदिन गरजांच्या वस्तूंचा समावेश होता. त्यासोबतच कुटुंबातील महिलेस साडी-चोळी आणि मुलांना नवे कपडे देऊन सणाचा आनंद द्विगुणित केला.
आर्थिक मदत माझी लाडकी नात धर्मवीरा मृत्युंजय गायकवाड हिच्याहस्ते घोती कुटुंबाला प्रदान करण्यात आली. यातून संवेदनशीलतेसोबतच घराघरात संस्कारांची परंपरा पुढे नेण्याचा भावही प्रकट झाला. मदतीचा हा हात मिळाल्यानंतर श्रीमती सुनिताताई घोती यांच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रू दाटून आले.
या हृदयस्पर्शी प्रसंगी मी स्वर्गीय गजानन घोती यांच्या चिमुकल्या मुलांना आणि त्यांच्या आईला स्वतःच्या हाताने प्रेमाने जेवण वाढून जेवायला लावले. त्या क्षणी त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेली सुरक्षिततेची आणि आपलेपणाची झळाळी — तो माझ्यासाठी आयुष्यभर लक्षात राहील असा अनुभव होता.
ही मदत शिवसेना मातोश्री जनसंपर्क कार्यालय, बुलढाणा येथे घोती कुटुंबातील सदस्य व ग्रामस्थांच्या उपस्थितीत देण्यात आली. या वेळी शिवसेना आणि युवासेनेचे पदाधिकारी तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.
संवेदनशील नेतृत्वाची खरी ओळख म्हणजेच — जनतेच्या दुःखात मनापासून सहभागी होणे.

