सागवन येथे वर्षावास ग्रंथवाचन समाप्ती सोहळा उत्साहात पार — सस्नेह भेट व मार्गदर्शन..!
आ संजय गायकवाड यांची प्रामुख्याने उपस्थिती...
सागवन ग्राम येथे आज पार पडलेल्या वर्षावास ग्रंथवाचन समाप्ती सोहळ्याला आ संजय गायकवाड यांनी उपस्थित राहून समाज बांधवांशी सस्नेह संवाद साधला. बौद्ध परंपरेतील हा सोहळा धार्मिक, सांस्कृतिक आणि आत्मिक साधनेचा परिपूर्ण संगम आहे.तथागत गौतम बुद्ध व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले आणि उपस्थित भाविकांशी संवाद साधताना सांगितले की,
“वर्षावास हा फक्त धार्मिक कार्यक्रम नसून आत्मचिंतन, सामाजिक ऐक्य आणि बौद्ध मूल्यांचा जागर करणारा उत्सव आहे. या साधनेतून समता, बंधुता आणि शिक्षणाच्या विचारांना बळ मिळते.”
समाज बांधवांना शिक्षण, संघटन आणि बंधुभाव या तत्त्वांवर कार्य करण्याचे आवाहन केले.

सागवन येथे या वर्षावासाचा प्रारंभ १० जुलै रोजी झाला होता, तर समाप्ती ६ ऑक्टोबर २०२५ रोजी करण्यात आली. समारोपानिमित्त धार्मिक विधी आणि भोजनदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.. आ संजय गायकवाड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले..
या प्रसंगी जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापती मा. दिलीप जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, डी. एस. लहाने सर, भाजपा तालुकाप्रमुख सतीश भाकरे पाटील, सरपंच देवानंद दांडगे, सदस्य गोपाल भाग्यवंत, गोटू शर्मा, सुनील सोनुने, कोकिळाताई तोमर तसेच असंख्य उपासक-उपासिका, समाज बांधव आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम शांत, शिस्तबद्ध आणि श्रद्धाभावाने पार पडला. धार्मिक साधनेसोबतच सामाजिक एकतेचा आणि बौद्ध संस्कृतीचा गौरव अधोरेखित करणारा हा उपक्रम ठरला.

