-1.6 C
New York
Monday, December 15, 2025

Buy now

spot_img

एसटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांवर महामंडळ उदासीन* *संयुक्त कृती समितीची परिवहन मंत्र्यांसोबत बैठक सुरु…*

बुलढाणा ब्रेकिंग

*एसटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांवर महामंडळ उदासीन*

*संयुक्त कृती समितीची परिवहन मंत्र्यांसोबत बैठक सुरु…*

एसटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्याबाबत राज्य परिवहन महामंडळाची उदासीनता उघड झाली. महामंडळ आर्थिक अडचणीत असून कामगारांच्या पगारासाठी पैसे नाहीत. अशा परिस्थितीत प्रलंबित मागण्यांची पूर्तता कशी करणार? महामंडळाला सरकारच्या मदतीची प्रतीक्षा आहे, असे स्पष्टीकरण महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या प्रतिनिधींना दिले. याबाबत परिवहन मंत्र्यांनी मंत्रालयात बैठक बोलावली असून त्याकडे कामगारांचे लक्ष लागले आहे. महायुती सरकारच्या काळात एसटी कामगारांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. त्यात महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीचा दर, दिवाळी भेट, सण उचल अशा आर्थिक मागण्यांचा समावेश आहे. या सर्व मागण्याच्या संदर्भात मंत्रालयात समिती सोबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत सुरु आहे… जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर महायुती सरकारच्या निष्क्रियतेविरोधात राज्यभरातील एसटी कामगारांनी १३ ऑक्टोबरपासून महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयापुढे धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीने दिला आहे.

राज्यभरातील सर्व एसटी कामगारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विविध संघटनांनी एकजुटीने लढा सुरू केला आहे. आर्थिक मागण्यांवर कुठल्याही परिस्थितीत दिवाळीपूर्वी तोडगा काढा, अशी आग्रही मागणी कृती समितीतर्फे करण्यात आली आहे. …..
एसटी कामगारांचा २०१८ पासूनचा महागाई भत्ता थकीत आहे. कोर्टाने आदेश दिल्यानंतरही महागाई भत्त्याची थकबाकी दिलेली नाही. २०१६ पासून वेतनवाढीचा दर एक टक्के देण्याचे मान्य करूनही तो अद्याप दिलेला नाही. घरभाडे भत्ता १०, २०, ३० टक्के लागू झालेला नाही आदी प्रश्नांकडे संयुक्त समितीने लक्ष वेधले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या