लोणार मेहकर विरोधी, शासन निर्णयाची शिवसेना उबाठा ने केली होळी
लोणार
९ ऑक्टोबर च्या महाराष्ट्र शासनाच्या शासन आदेशा मधून लोणार व मेहकर तालुका नैसर्गिक आपत्ती निवारण सहाय्य योजने मधून वगळण्याच्या विरोधात शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे यांनी तहसील समोर शासन निर्णयाची होळी करून आपल्या भावना व्यक्त केल्या
सविस्तर वृत्त असे की ०९ ऑक्टोबर २०२५ रोजी महसूल व वन विभागाने काढलेल्या शासन आदेशात महाराष्ट्रातील २५३ तालुके हे अतिवृष्टी ग्रस्त म्हणून या जीआर नुसार घोषित करण्यात आले परंतु बुलढाणा जिल्ह्यातील लोणार, मेहकर, हे दोन तालुके जेथे सर्वात जास्त अतिवृष्टी झाली आहे, लोणार व मेहकर तालुक्यातील सरासरी जमिनी खरडून वाहून गेले आहे शेत रस्ते, बंधारे वाहून गेलेले आहेत अनेक विहिरी खचल्या आहेत बुलढाण्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनीही दौरा करून सत्य परीस्थिती स्वतःच्या डोळ्यांनी बघितली आहे असे असतानाही बाधित लोणार व मेहकर हे दोनही तालुके नैसर्गिक आपत्तीच्या निवारण सहाय्य योजनेतून हेतू पुरस्कार वगळण्यात आले आहे, म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने मेहकर लोणार विधानसभेचे आमदार सिद्धार्थजी खरात व जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे यांचे नेतृत्वात दि. ०९ ऑक्टोबर २०२५ च्या शासन निर्णयाची होळी तहसील कार्यालय लोणार समोर करून तहसीलदारामार्फत महामही राज्यपाल यांना निवेदन देऊन त्वरित आपत्तीग्रस्तांच्या यादीत लोणार मेहकर तालुका घेण्यात यावा नसता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक रस्त्यावर उतरतील असा इशाराही देण्यात आला.
याप्रसंगी शिवसेना उबाठा पक्षाचे आमदार सिद्धार्थजी खरात जिल्हा संघटक डॉ गोपाल बछिरे यांच्यासह शहर प्रमुख गजानन जाधव सर, ज्येष्ठ शिवसैनिक ॲड. दीपक मापारी तालुका संघटक विजय मोरे, महिला संघटिका तारामती जायभाये, शालिनीताई मोरे, तालुका उपसंघटिका लीलाताई मते, शहर उपप्रमुख लूकमान कुरेशी, शहर संघटक तानाजी मापारी, ज्येष्ठ शिवसैनिक सुदन अंभोरे सर, प्रकाशभाऊ सानप, नितीन मोरे, उपसरपंच रवींद्र सुटे, युवा तालुका अधिकारी जीवन घायाळ, युवा शहर अधिकारी श्रीकांत मादनकर, विभाग प्रमुख गोपाल मापारी, तानाजी अंभोरे, अमोल सुटे, विजय घोडके, अश्रुबा धारकर, मंगेश मोरे, अमोल पसरटे, स्वप्नील हाडे, ज्ञानेश्वर दूधमोगरे, अल्पसंख्यांक चे अशपाक खान, फहीम खान, उमेश मोरे, नदीम कुरेशी, शेख वाजीद, यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते

