-1.6 C
New York
Monday, December 15, 2025

Buy now

spot_img

मदत पॅकेज व सवलतींमध्ये मेहकर लोणार तालुक्यांचाही झाला समावेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संजय रायमुलकरांचे बोलणे झाल्यावर एक तासात शासन परिपत्रक

मदत पॅकेज व सवलतींमध्ये मेहकर लोणार तालुक्यांचाही झाला समावेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संजय रायमुलकरांचे बोलणे झाल्यावर एक तासात शासन परिपत्रक

मेहकर
राज्य शासनाने अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज व सवलती काल जाहीर केल्या. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस मेहकर लोणार तालुक्यात होऊनही होऊनही या तालुक्यांचा त्यात समावेश नव्हता. माजी आमदार संजय रायमुलकर यांनी आज मुख्यमंत्री फडणवीस,कृषिमंत्री दत्ताजी भरणे, पालकमंत्री मकरंद पाटील ,उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याशी संपर्क साधून मेहकर लोणार तालुक्याचा समावेश करण्याची मागणी केली. सदर दोन्ही तालुक्यांचा त्यात समावेश करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सांगितले. आणि त्यानंतर एक तासातच शासनाचे परिपत्रक निघाले व मेहकर लोणार तालुक्याचा पॅकेज मध्ये समावेश करण्यात आला.
बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सगळ्यात मोठे नुकसान मेहकर, लोणार तालुक्यांमध्ये झालेले आहे, हे सर्वश्रुत आहे. जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीतील बाधितांना विशेष मदत पॅकेज व सवलती राज्य शासनाने काल ता. ९ रोजी परिपत्रक जारी करून लागू केल्या. राज्यातील २५३ तालुक्यांचा यात समावेश होता. परंतु मेहकर, लोणार तालुक्याचा समावेश नव्हता. त्यामुळे माजी आमदार संजय रायमुलकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, कृषिमंत्री दत्ताजी भरणे, पालकमंत्री मकरंद पाटील यांच्याशी भ्रमणध्वनी वरून सविस्तर चर्चा करून मेहकर ,लोणार तालुक्यांचा सदर विशेष मदत पॅकेज व सवलतींमध्ये समावेश करावा अशी मागणी केली.
आज दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी संजय रायमुलकर यांच्याशी संपर्क साधून मेहकर आणि लोणार तालुक्यांचा सदर विशेष मदत पॅकेज व सवलतींमध्ये समावेश करीत आहोत, तसा शासन आदेशही प्रसिद्ध करण्याची व्यवस्था करतो आहे, असे सांगितले. आणि एकाच तासात दोन्ही तालुक्यांचा पॅकेज व सवलतींमध्ये समावेश झाल्याचा शासनाचा जी आर निघाला. या दोन्ही तालुक्यांचा विशेष पॅकेज मध्ये समावेश नसल्याबद्दल काल आणि आज समाज माध्यमांवर शासनविरुद्ध रोष व्यक्त केल्या जात होता. विरोधकांकडून शासनावर टीका केली जात होती. शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती.
पालकमंत्री मकरंद पाटील यांनी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सर्वाधिक नुकसान मेहकर ,लोणार तालुक्यात झाल्याचे मान्य करून यादीत अनावधानाने हे दोन तालुके सुटले असल्याचे संजय रायमुलकर यांना सांगून दोन्ही तालुक्यांचा विशेष मदत पॅकेज व सवलतींमध्ये समावेश करत असल्याचे सांगितले. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनीही भ्रमणध्वनीवरून रायमुलकर यांच्याशी संपर्क साधत त्यांना सकारात्मक बातमी देऊन मोठा दिलासा दिला. केंद्रीय आयुष, आरोग्य, कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व संजय रायमुलकर यांनी याबद्दल शासनाचे आभार मानले आहेत. कुठल्याही परिस्थितीत मेहकर, लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. महायुती शासन सातत्याने सहकार्य करण्यासाठी आपल्या सोबत आहे, असे संजय रायमुलकर यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलतांना सांगितले.
जून महिन्यात मेहकर, लोणार तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानीबबत शासनाकडून शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून प्रतापराव जाधव व संजय रायमुलकर यांनी अथक पाठपुरावा केला होता. त्यामुळे मेहकर तालुक्यातील शेतकऱ्यांना ५५ कोटी ७४ लाख रुपये व लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांना १५ कोटी ८१ लाख रुपये मंजूर करण्यात आले. जमीन खरडणे व शेतात गाळ येऊन नुकसान होणे या बाबतचे साडेसहा कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे काम प्रगतीत असून उर्वरित रकमेचे वितरण शेतकऱ्यांना करण्यात आले आहे, अशीही माहिती रायमुलकर यांनी दिली. अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधीतांना विशेष मदत पॅकेज व सवलती मध्ये मेहकर लोणार तालुक्याचा समावेश करत असल्याबद्दल रायमुलकर यांनी शासनाचे आभार मानले आहेत.
*******************

Related Articles

ताज्या बातम्या