-1.6 C
New York
Monday, December 15, 2025

Buy now

spot_img

लव्ह ट्रँगलमधून प्रियकराला एका अधिकाऱ्याने धो-धो धुतले,होतेय खात्याची प्रतिमा मालिन…

लव्ह ट्रँगलमधून प्रियकराला एका अधिकाऱ्याने धो-धो धुतले,होतेय खात्याची प्रतिमा मालिन…

बुलढाणा जिल्ह्यातील खांमगाव विभागातील सर्वांना न्याय देणारे,कायदा व सुव्यवस्था सांभाळणाऱ्या एका ऑफिस मधील प्रमुख असलेले अधिकाऱ्याच्या नावाची चर्चा सध्या रंगतेय. या प्रमुख अधिकाऱ्याने प्रियेसीच्या प्रियकराला धो-धो धुतले आहे.एवढेच नव्हे तर या प्रियकराला या अधिकाऱ्याने जिवे मारण्याची आणि गांव सोडुन जाण्याच्या धमक्या दिल्याचे माहिती देखील सूत्रांकडून हाती लागली आहे..

खांमगावच्या सूत्रांकडून माहिती प्राप्त झाली आहे की,खांमगाव विभागातील जनतेला न्याय देणाऱ्या एका ऑफिसचे प्रमुख अधिकाऱ्याने आपल्याच ऑफिस मधील महिला कर्मचाऱ्यासोबत ‘अफेअर’ केलं.त्याच्यासोबत केलेल्या “गुटरगु” ची माहिती या महिला कर्मचाऱ्याच्या प्रियकराला माहीत पडल्यानंतर तो थेट त्या अधिकाऱ्याला त्याच्या ऑफिस मध्ये भेटायला गेला असता तिथे या अधिकाऱ्याने त्या प्रियकरासोबत अर्वाच्य भाषेत संभाषण करून त्याला धमकी दिली व त्याला ऑफिस मधून हाकलून लावले…एवढे वर थांबता या अधिकाऱ्याने त्या प्रियकराला एका अज्ञात ठिकाणी बोलवून मेला चित्रपटातील “गुर्जर” विलंन सारखे आक्रमक होऊन धो-धो धुतले आहे.शिवाय या अधिकाऱ्याने प्रियकराला जिवे मारण्याची आणि गांव सोडुन जाण्याच्या धमक्या दिले आहे.याबाबतची चर्चा संपूर्ण खांमगावात रंगतेय..या प्रकरणात जिल्ह्यातील जनतेला न्याय देणाऱ्या प्रमुख असलेले कर्तव्यदक्ष अधिक्षक साहेबांनी यांची गंभीर दखल घेत त्या लव्ह ट्रँगलमध्ये अडकलेल्या विभाग प्रमुख वादग्रस्त अधिकाऱ्याची तातळीने त्या ऑफिस मधून उचल बागळी करावी.व होत असलेली खात्याची प्रतिमा मालिन होण्यापासून रोखावे एवढी विनंती..

Related Articles

ताज्या बातम्या