बुलढाणा
अभिता कंपनीच्या पहिल्या महिला ड्रोन पायलटपदी केळवदची उज्वला हिवाळे* भडगाव येथे तूर फवारणीने सेवेला प्रारंभ…..
सुनील शेळके कल्पक नेतृत्व ……

.अभिता कंपनीच्या पहिल्या महिला ड्रोन पायलटपदी केळवदची उज्वला हिवाळे* भडगाव येथे तूर फवारणीने सेवेला प्रारंभ
*अभिमानास्पद*….अभिता कंपनीच्या पहिल्या महिला ड्रोन पायलटपदी केळवदची उज्वला हिवाळे* भडगाव येथे तूर फवारणीने सेवेला प्रारंभ…
कृषी क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा नावलौकिक असलेल्या अभिता कंपनीमध्ये पहिली महिला ड्रोन पायलट म्हणून केळवदची उज्ज्वला हिवाळे रुजू झाली आहे. जिल्ह्यासाठी ही अभिमानास्पद बाब आहे. दरम्यान आज तालुक्यातील भडगाव येथील केशवराव तायडे यांच्या शेतात ड्रोनद्वारे तूर फवारणी करुन तिने सेवेला प्रारंभ केला.

अभिता ऍग्रो इंडस्ट्रीज प्रा. लि. कंपनी शेती तंत्रज्ञानासाठी तत्पर असून कंपनीने बुलढाणा जिल्ह्यासाठी भाडेतत्वावर कृषी ड्रोन सुविधा सुरू केली आहे. एक एकर फवारणीसाठी अवघ्या सात -आठ मिनिटांचा अवधी लागतो. यासाठी ९० टक्के पाण्याची बचत होते. शिवाय औषध प्रभावीपणे पिकांना लागू होतात. ड्रोन फवारणी हा पहिला व वेगळा उपक्रम शेतकरी बांधवांसाठी सुरू करत असल्याचे अभिता ऍग्रो कंपनीचे सीईओ सुनील शेळके यांनी सांगितले. स्वतः शेतकरी कुटुंबातील असल्याने ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर शेतकऱ्यांसाठी हा उपक्रम त्यांनी सुरू केला आहे.
फवारणीतील धोक्याची मिटली चिंता :
पीक वाढलेले असताना पिकावर औषध फवारणी करणे हे दिव्यच असते. पाठीवर स्प्रे पंप घेऊन काम करणे देखील अंग मेहनतीची आहे. शिवाय सर्प, विंचूदंशच्या घटनाही घडतात. बळीराजाला मात्र हे धोके वारंवार पत्करावे लागतात. आज तंत्रज्ञान विकसित झाले आहे. त्याच तंत्रज्ञानाची कास धरून ड्रोन फवारणीचा पर्याय प्रथमच जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झाला आहे.
प्रशिक्षित कर्मचारी व वाहन सुविधा :
कंपनीचे सीईओ सुनील शेळके यांनी वाहन व कर्मचारी देखील प्रशिक्षित केले आहेत. बुलढाणा येथे कंपनीचे ऑफिस सुरू करण्यात आले आहे. येथेच शेतकऱ्यांना फवारणीसाठी संपर्क करता येणार आहे.
सुनील शेळके कल्पक नेतृत्व :
अभिता ऍग्रो कंपनीचे सीईओ सुनील शेळके हे कल्पक नेतृत्व आहे. विविधांगी प्रयोग त्यांनी जिल्ह्यामध्ये केले. संत्रा प्रक्रिया उद्योग, अभीता ऍग्रो कंपनी, चित्रपट निर्मिती अशा वेगवेगळ्या संकल्पना त्यांनी राबवल्या व यशस्वी केल्या. जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ड्रोन फवारणी चा पर्याय असावा हा विचार गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या मनामध्ये घोळत होता. त्याला मूर्त रूप देत त्यांनी फवारणीसाठी भले मोठे ड्रोन उपलब्ध केले आहे.

